मुरलीधर भवार
कल्याण-पडघा मार्गावरील गांधारी ब्रीज जवळ एका घुबडाच्या पायात पंतगाचा माजा अडकून तो जखमी झाल्याची माहिती मिळताच वन्यजीव मित्रांनी त्याठिकाणी धाव घेतली. दुर्मिळ जातीचा घुबडाला वन्यजीव मित्रांनी जीवदान दिले आहे.
वन्यजीव मित्र महेश बनकर यांना कल्याण डोंबिवली महापालिकेचे सचिव संजय जाधव यांचा फोन आला. गांधारी ब्रीजजवळ एक घुबड आढळून आले आहे. त्याच्या पायात मांजा अडकून ते जखमी झाल्याची माहिती दिली. वन्यजीव मित्र सुहास पवार, दत्ता बोंबे, मुरलीधर जाधव यांनीही त्याठिकाणी धाव घेतले. डोंबिवलीहून ब्रीजजवळ सूवरेदय पाहण्यासाठी आलेल्या तीन जणांनी आडोसा करुन त्याला कुठेही जाऊ दिले नाही. त्याठिकाणी वन्यजीव प्रेमी मंडळी पोहचली. घुबडाला ताब्यात घेतले. त्याच्या पायातील अडकलेला मांजा काढला. त्याला मांजामुळे झालेल्या जखमेवर प्राथमिक उपचार करण्यात आले.
मिळून आलेले घुबड हे प्राच्य शिंगळा जातीचे दुर्मिळ घुबड असल्याची माहिती वन्यजीव अभ्यासक अविनाश भगत यांनी दिली. या प्रकारचा घुबडाला इंग्रजी भाषेत ओरियंटल स्कॉप्स ओव्हल असे संबोधले जाते. या घुबडाला पुन्हा निसर्गता सोडून देण्यात येणार असल्याचे बनकर यांनी सांगितले.