कल्याण-कल्याण पूर्वे भागातील रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉकवरुन गरोदर महिला तिच्या नातेवाईकासह रुग्णालयात जात असताना तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. तिच्या प्रसूतीसाठी रिक्षा चालक धावले. यावेळी रिक्षा चालकांनी १०८ नंबरवर कॉल करुन रुग्णवाहिका मागविली असता त्यांच्याकडून रुग्णवाहिका निघाली असल्याचे सांगितले. मात्र रुग्णवाहिका आलीच नाही. तिची प्रसूती स्कायवॉकवरच झाली. अखेरीच खासजी रुग्णवाहिकेच्या सहाय्याने तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ती व तिचे नवजात बाळ सुखरुप असल्याची माहिती मदतीसाठी आलेल्या रिक्षा चालकांनी सांगितले.
कल्याण पूर्व भागात राहणारी गरोदर महिला सुरेखा शिंदे हिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्याने ती तिच्या नातेवाईकासोबत महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात निघाली होती. कल्याण पूर्वेतील रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर पोहचली असता तिला प्रसूतीच्य ावेदना असहाय्य हाेऊ लागल्या. वेदनांची तीव्रता वाढली. तिच्या मदतीला रिक्षा चालक धावले. त्यांनी तिला रुग्णालयात नेण्याकरीता रुग्णवाहिकेसाठी १०८ नंबरला केला. त्यावेळी तिथून असे सांगण्यात आले की, आम्हाला रुग्णवाहिकेसाठी आणखीन दोन तीन जणांचे कॉल्सआले होते. आमची रुग्णवाहिका निघाली आहे असे सांगण्यात आले. मात्र त्याठिकाणी रुग्णवाहिकाच पोहचली नाही. अखेर महिलेची अवघड अवस्था पाहून रिक्षा चालकांनी प्रसंगावधान राखत एका महिलेला पाचारण केले. तिची प्रसूती स्कायवॉकवरच झाली. १०८ नंबरवर कॉल करुनही रुग्णवाहिका पोहचली नसल्योन अखेरीस खाजगी रुग्णवाहिकेस पाचारण करण्यात आले. खाजगी रुग्णवाहिकेतून प्रसूती झालेल्या महिलेसह तिच्या नवजात बाळास खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ते धावले तिच्या मदतीलारिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन गणेशोत्सव मंडपात उपस्थित असलेले उपाध्यक्ष विजय तावडे कार्यकर्ते संजय जगताप यांना प्रसंगावधान दाखविले. रुग्णवाहीकेने रुग्णालयात दाखल करण्यास बाबा शेख, चदंन शिवे,मनोज यादव,श्री जोशी, गणेश सुर्यवंशी, 'प्रेम बंगाली ह्या रिक्षा चालकांनी मदत केली .
काही दिवसापूर्वी गरदोर महिलेला प्रसूतीच्या वेदना स्कायवॉकवर सुरु झाल्यावर तिला हातगाडीवरुन महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात आणले असता. त्याठिकाणी तिला प्रसूतीकरीता दाखल करुन न घेतल्याने तिची प्रसूती रुग्णालयाच्या दारात झाली होती. त्यामुळे महापालिका रुग्णालयाची अनास्था उघड झाली होती. आत्ता पुन्हा एका महिलेची प्रसूती स्कायवॉककवर झाली. तिच्यासाठी १०८ नंबरवर रुग्णवाहिकेसाठी का’ल करुन रुग्णवाहिका आली नाही. ही बाब या घटनेतून उघड झाली आहे.