कल्याण: आतंकवाद्यांनी काश्मीर मधील अनंतनाग जिल्ह्यात भारतीय सैनिक व अधिकाऱ्यांवर हल्ला केला. यात भारतीय सैन्याचे अधिकारी कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धनोक, डिएसपी हुमायू भट व रायफलमन रवी कुमार हे शहीद झाले. आतंकवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्लाचा आम आदमी पक्षाच्या वतीने शुक्रवारी निषेध करण्यात आला. तहसिल कार्यालयावर धडक देत आंदोलनकर्त्यांनी निवेदन दिले.देशातील सैनिकांवर हल्ले होत असताना, केंद्र सरकार स्वतःची स्तुती करण्यात व्यस्त आहेत.
सर्वसामान्यांचे जगण्याचे प्रश्न सुटलेले नाहीत, त्याचबरोबर देशाच्या सीमा सुद्धा असुरक्षित झाल्या आहेत. देशातील लोकसभेच्या निवडणुका जवळ येतात तस तसे देशातील सैनिकांवर आतंकवाद्यांन तर्फे हल्ले वाढताना दिसून येत आहेत. पुलवामा हल्ल्याची साधी चौकशी सुद्धा अजून झालेली नाही याला सर्वस्वी जबाबदार केंद्रातील मोदी सरकार व त्यांनी राबविलेले चुकीचे धोरण आहे. या सर्व बाबींचा आम्ही एक भारतीय नागरिक म्हणून केंद्र सरकारच्या नितींचा निषेध करतो.
शेवटी, प्रभू श्री रामा जवळ एवढीच प्रार्थना आहे की हे श्री रामा आपण मोदींना व केंद्रातील सरकारला देशाच्या सुरक्षेबाबत सैनिकांबाबत व नागरिकांच्या चांगल्या कल्याणकारी नीती धोरणांबाबत सुदबुद्धी दे अशा शब्दात आप पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तोंडसुख घेतले. पक्षाचे कल्याण डोंबिवली शहर अध्यक्ष धनंजय जोगदंड यांच्या नेतुत्वाखाली हे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलकर्त्यांकडून कल्याणचे तहसिलदार जयराज देशमुख यांना निवेदन देण्यात आले.