कल्याण- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून गेल्या वर्षी थकीत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुलीसाठी अभय योजना राबवण्यात आली होती .थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेत थकीत मालमत्ता कराच्या रकमेचा भरणा केल्याने महापालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली होती . त्या पाठोपाठ आत्ता पाणी बिलांचा वसूली करण्यासाठी ४ ते ३१ मार्च दरम्यान पाणी बिलासाठी अभय योजना जाहिर करण्यात आली असल्याी माहिती आयुक्त इंदूराणी जाखड यांनी दिली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पाणी पट्टी थकबाकीदारांनी लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्तांकडून करण्यात आले आहे.
लोक अदालतमध्ये ही योजना सुरू करण्यात येणार असून मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत ही योजना सुरू राहणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पाणीपट्टी बिल वसुली मध्ये वसुलीची टक्केवारी कमी असल्याने पाणीपट्टी वसुली वाढवण्याच्या दृष्टीने बिल वाटप वेळवर झालं पाहिजे त्या वसुलीसाठी जो पाठपुरावा लागतो, तो व्यवस्थित रित्या वायला पाहिजे या अनुषंगाने काही पाउल उचलली आहेत . या अभय योजनेमुळे पाणीपट्टी आणि कर वसुलीने लाभ मिळेलच अनधिकृतपणे पाणी कनेक्शन्स आहेत त्याच्यावर या अनुषंगाने कारवाई करू जे अधिकृत रित्या पाणी घेणारे आहेत त्यांना व्यवस्थित पाणी मिळेल असे आयुक्त जाखड यांनी सांगितले .