कल्याण-कल्याण लोकसभा मतदार संघाकरीता काल मतदान पार पडले. या मतदार संघातून ८० हजार मतदारांची नावे गायब झाली आहे. त्यामुळे ८० हजार मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. ते वंचित राहिले आहे. या लाेकसभा मतदार संघात फेर निवडणूक घेण्यात यावी असी मागणी बिग बा’स फेम कल्याण लोकसभेतील अपक्ष उमेदवार अभिजीत बिचुकले यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ््यांकडे केली आहे. निवडणूक आयोगाने त्यांची मागणी विचारात घेतली नाही तर बिचुकले येत्या २७ मे पासून आमरण उपोषण सुरु करणार असल्याचा इशारा बिचुकुले यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.
अपक्ष उमेदवार बिचुकले यांनी आज कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषणा सातपुते यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदनही बिचुकले यांनी सादर केले आहे. बिचुकले यांनी सांगितले की, कल्याण लोकसभा मतदार संघात कमी टक्के मतदान झाले आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, कल्याण लोकसभा मतदार संघात मतदान सुरु होते. त्यावेळी त्याठिकाणी निवडणूक प्रक्रिये काही तरी गडबड लफडा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद पाहिली तर त्याठिकाणी त्यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाचे काम थोडेसे मनमानी कारभाराचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असल्याने संपूर्ण प्रशासन त्यांच्या हाती आहे. हे प्रशासन त्यांच्या हाताखाली काम करीत आहे. मी कल्याण लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार असल्याने या प्रकरणी मी जातीने लक्ष घालून. निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले. या ठिकाणी ताबडतोब आयोगाला कळवा की, बिचुकले यांची सूचना आहे. या मतदार संघात ८० हजार नावे लुप्त केली असतील तर एका माणसाचे नाव जरी झाले तरी लोकहिताला बाधा येते. हे कामकाज सरकारच्या माध्यमातून प्रेरित आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. मतदानापासून लोकांना तूम्ही वंचित ठेवत असाल तर संपूर्णत: मी प्रथम भारतीय आहे. शेवटही मी भारतीयच आहे. भारतीय निवडणूक आयोगाने मतदारांचा अधिकार लूप्त केला. त्यासाठी कल्याण लोकसभा मतदार संघातील निवडणूक पुन्हा घ्या. अन्यथा २७ मे रोजी अपक्ष उमेदवार आणि ज्या मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता आला नाही. त्यांच्या वतीने आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बिचुकले यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे.