कल्याण - अदानी समूहाने एनएअरसी लिमिटेडची पूर्वीची महावितरणची थकबाकी पूर्णपणे चुकती केली व त्यापोटी महावितरणच्या कल्याण कार्यलयात १.६९ कोटी रकमेचे दोन धनादेश सादर केले. बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याबद्दल महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अदानी समूहाचे आभार मानले.
एनएअरसी लिमिटेड ही कल्याण -मोहने स्तिथ कंपनी सप्टेंबर २००९ मध्ये बंद पडली, त्यानंतर गंभीर आर्थिक परिस्थितीमुळे कंपनीकडून वीजबिलाचा नियमित भरणा करण्यात येत नव्हता. शेवटी महावितरणने २००१६ मध्ये कंपनीचा वीज पुरवठा तोडला. परंतु अनेक निवेदने मिळाल्याने कॉलनीला ज्या पंप हाऊस मधुन पाणी पुरवठा होत होता त्या लाईनचा पुरवठा महावितरणने सुरु केला. परंतु एनआरसी लिमिटेड कडून पम्प हाऊस चे बिल पण भरले जात नव्हते. यावरून कंपनी व महावितरण यांच्यात वाद-विवाद सुरु होते.
दरम्यानच्या काळात आर्थिक संस्थांनी एनआरसी विरोधात २०१८ मध्ये दिवाळखोरी आणि नादारी कायद्याच्या (आयबीसी) अंतर्गत राष्ट्रीय कंपनी कायदा लवाद (एनसीएलटी) मध्ये कर्ज वसुलीसाठी दावा दाखल केला. एनसीएलटी कोर्टाच्या आदेशानुसार, कोर्टाने जो नादारी आदेश काढला त्या आधीची सर्व देणी हि रद्दबातल होतात. त्यामुळे आयबीसी कायद्याच्या तरतुदी नुसार कोर्टाच्या नादारी आदेशाच्या दिवसापासून जे विजेचे बिल असेल तेवढेच अदाणी समूह देणे लागतो. त्यानुसार अदाणी समूहाने आपले म्हणणे महावितरण समोर मांडले व त्यांनतर महावितरणने १.६९ कोटी रुपयांचे नवीन देयक अदाणी समूहाला पाठवले.