सचिन सागरे, लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण : जागतिक एड्स दिनानिमित्त आयसीटीसी, रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण, अचिव्हर्स कॉलेज, बिर्ला कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृती प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य वैद्यकीय अधिकारी पुरुषोत्तम टिके यांच्या मार्गदर्शनाखाली आयसीटीसीचे कृष्णा कुमावत आणि अचिव्हर्स कॉलेजचे राजेश यादव यांनी नियोजनबद्ध जनजागृती प्रभातफेरी काढली. रुक्मिणीबाई रुग्णालय येथून सुरू झालेली प्रभातफेरी छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, संतोषी माता मंदिर रोड मार्गे, अचीव्हर्स कॉलेज येथे विसर्जित करण्यात आली.
एचआयव्ही बाबतची माहिती देताना आपण सर्वानी आरोग्य सेवेच्या लाभ घ्यावा असे, क्षयरोग अधिकारी डॉ. समीर सरवणकर यांनी सांगितले.त्याचप्रमाणे एचआयव्ही एड्स विषयी जनजागृती ही सामाजिक काम आहे असे मत अचिव्हर्स कॉलेजचे संचालक डॉ. महेश भिवंडीकर यांनी व्यक्त केले
या रॅलीत आयसीटीसीचे विभाग प्रमुख डॉ. सुलक्षणा त्रिभुवन, डॉ. अशोक भिडे, अश्विनी ठाकरे, सीमा शेजवळ, शैला गायकवाड, साक्षी खोत तसेच बिर्ला कॉलेजचे प्रा. संदेश जयभये, प्रा नेहा त्रिपाठी, मुथा कॉलेज अतुल पांडे, प्रा दिलीप सिंग, सोनवणे कॉलेजचे शशिकांत तिवारी, एम. के. कॉलेजचे रवी सांडगे तसेच मॉडर्न कॉलेज, प्रगती कॉलेजमधील एनएसएस विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सहभागी झाले होते. आस्था परिवार संस्था आयसीटीसी विभाग कल्याण, कोळशेवाडी, शास्त्रीनगर हॉस्पिटल डोंबिवली, एआरटी विभाग, कल्याण ही या प्रभातफेरीत सहभागी झाले होते.
दरम्यान, पथनाट्य सादर करून जनतेपर्यंत एचआयव्ही प्रतिबंचा संदेश देण्यात आला. आयसीटीसी कर्मचाऱ्यानी एचआयव्हीबाबतची शपथ सर्व उपस्थितांना दिली. 'संयम पाळा, एड्स टाळा' असा नारा देऊन फेरीच्या माध्यमातून एड्स या आजाराबाबत जनजागृती संदेश देण्यात आले. या प्रभातफेरीत ३०० विद्यार्थ्यांसह ५० अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.