कल्याण - नवी मुंबई विमानतळास लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला भूमीपूत्रंनी प्रतिसाद देत कल्याणडोंबिवलीसह ग्रामीण भागात भूमीपूत्रंनी मानवी साखळी तयार करुन राज्य सरकारचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला. हे आंदोलन आत्ता शांततेच्या मार्गाने करीत आहोत. यापुढील आंदोलनात संयम ठेवला जाणार नाही, असा इशारा भूमीपुत्रांनी यावेळी सरकारला दिला आहे. भर पावसात ही मानवी साखळी तयार करण्यासाठी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते.
कल्याण पूर्व भागातील तीसगाव नाका, चक्कीनाका, नेवाली नाका, आडीवली ढोकली, द्वारली भाल, काटई, मानपाडा, भोपर, शीळ फाटा या ठिकाणी भूमीपूत्र रस्त्यावर उतरले होते. त्यात महिला ही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सगळेच भूमीपूत्र हे आग्रही होते. त्यामध्ये ग्रामीण भागातील वारकरी संप्रदायाचे लोकही सहभागी झाले होते. यावेळी भाजप आमदार गणपत गायकवाड हे मानवी साखळीत सहभागी झाले होते.
आगरी यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वङो यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंसाठी रक्त सांडले आहे. विमानतळास त्यांचेच नाव द्यावे. भर पावसात भूमीपूत्र रस्त्यावर उतरला आहे. 24 तारखेला सिडकोत भव्य मोर्चा याच मागणीसाठी आहे. आत्ता समाजाचा संयम सुटण्या आधीच सरकारने समाजाच्या मागणीचा विचार करावा याकडे वङो यांनी लक्ष वेधले आहे.
आमदार गायकवाड म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील याचे नावे देण्याची मागणी रास्त आहे. मात्र हे सरकार मनमानी करीत आहे. शिवसेनेच्या नेत्यांची नावे विविध प्रकल्पांना दिली जात आहे. भूमीपूत्रंचे नेते असलेल्या दि. बा. पाटील यांचेच नाव विमानतळास द्यावे. मनसेचे आमदार राजू पाटील हे देखील मानवी साखळीत सहभागी झाले.
ते म्हणाले की, विमानतळास दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणी संदर्भात सरकारची भेट घेतली होती. मात्र सरकार ही मागणी मान्य करण्यास तयार नाही. आता मानवी साखळी शांततेत पार पडली असलीत समाज यापूढील आंदोलनात शांतता आणि संयम ठेवणार नाही असा इशारा सरकारला दिला आहे. आडीवली ढोकली या ठिकाणी पार पडलेल्या मानवी साखळीत माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांनी भूमीपूत्रंच्या हितासाठी रक्त सांडले होते. त्यांचेच नाव विमानतळास द्यावे. सरकारने या प्रकरणी राजकारण करु नये याकडे लक्ष वेधले.