अनिकेत घमंडी/डोंबिवली: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, या गौरवशाली पर्वानिमित्त देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. त्यानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी मनात रहावी व त्यासाजे संस्मरण व्हावे 11 ते 17 ऑगस्ट 2022 रोजी हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. कल्याण पश्चिम मधील 100 टक्के नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज लावत या अभिमानाच्या अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक, माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केले.
हर घर तिरंगा या अभियानाच्या पूर्वनियोजनासाठी भारतीय जनता पार्टी मोहोने - टिटवाळा मंडळाची बैठक झाली. दरम्यान माजी आमदार नरेंद्र पवार कार्यकर्त्यांशी बोलत होते. प्रत्येक घरावर तिरंगा उभारला जवळ याची स्वतः खात्री करा आणि जास्तीत जास्त नागरिकांना प्रेरित करा असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले. यावेळी मोहोने टिटवाळा मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर, सरचिटणीस संतोष शिंघोळे, अनंता पाटील, प्रमोद घरत, महिला मोर्चा अध्यक्षा मनिषा केळकर, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप पाटील, रमेश कोनकर आदी. मोहोने टिटवाळा मंडळातील सर्व वार्ड अध्यक्ष, मंडळ पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, जिल्हा पदाधिकारी,युवामोर्चा पदाधिकारी,महिला मोर्चा पदाधिकारी,सर्व आघाड्या, सर्व सेल अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.