लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण शीळनजीकच्या देसाई खाडीत मासेमारी करणाऱ्या धनाजी भोईर यांच्या जाळ्य़ात ॲलीगेटर जातीचा मासा अडकला. तो जाळ्य़ातून बाहेर काढल्यावर काही वेळ जिवंत होता. त्यानंतर मृत पावला. देसाई खाडीत ॲलीगेटर आढळल्याने या खाडीत विविध प्रकारची जैवविविधता असल्याचा पुरावा पुन्हा एकदा मिळाला आहे.सह्याद्रीच्या फूट हिल्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलंग गडाच्या डोंगरपट्टीतून वाहत येणारी मोथली नदी ही पुढे देसाई खाडी म्हणून ओळखली जाते. तेथे गोड्या व खाऱ्या पाण्याचा संगम आढळून येतो. ॲलीगेटर हा मासा स्वच्छ पाण्यात आढळतो. देसाई खाडीत तो कुठून व कसा आला, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
तळोजा येथील मोथली नदीच्या प्रदूषणाकडे होतेय दुर्लक्षतळोजा एमआयडीसीपासून मोथली नदी वाहते. ती देसाई खाडीला येऊन मिळेपर्यंत प्रचंड प्रदूषित झालेली आहे. उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधात हरित लवाद व सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू आहे; मात्र मोथलीला प्रदूषणापासून वाचविण्यासाठी अशा प्रकारचा कोणताही लढा सुरू नाही. ॲलीगेटर मासा तेथे आढळल्याने ही नदी व खाडी परिसरात चांगल्या प्रकारची व विविध जातीची मत्स्यसंपदा असल्याचे अधोरेखित झाले आहे.
उत्तर अमेरिकेत आढळतो ॲलीगेटरn ॲलीगेटर हा मासा उत्तर अमेरिकेतील गोड्या पाण्यात आढळतो. २०१८ सालच्या पुरानंतर तो केरळमध्ये आढळला होता. त्यानंतर तो गेल्या काही वर्षांपासून कोलकाता, भुवनेश्वर या ठिकाणी आढळून येत आहे. n तो पाण्यात प्रचंड मारका मासा म्हणून ओळखला जातो. सुसरीसारखे याचे तोंड असते. लांबलचक असलेल्या वाम माशासारखा ॲलीगेटर दिसतो. हा मासा जवळपास १० फूट लांब असतो. त्याचे वजन खूप असते. भारतात त्याला प्रति किलोमागे ५०० रुपये भाव मिळतो.