पंकज पाटील, अंबरनाथ: मधील अथर्व धेंडे या १३ वर्षीय मुलाने राज्यस्तरीय पेंचाक सिलाट स्पर्धात रौप्य व कांस्य पदकाची कमाई केली. अथर्वच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तो आता राष्ट्रीय पेंचाक सिलाट स्पर्धेसाठी देखील पात्र ठरणार आहे. 01आणि 02 ऑक्टोबर 2023 रोजी कोल्हापूर येथे सुरु असलेल्या 13 वी महाराष्ट्र राज्य पेंचाक सिलाट सब-जुनिअर व जुनिअर चॅम्पिअनशिप 2023 या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून अथर्वने ठाणे जिल्ह्यासह अंबरनाथ तालुक्याचे प्रतिनिधित्व केले.
या स्पर्धेत 12-13 वर्षीय वयोगटातील 51 ते 54 किलो वजनी गटात टँडींग (फाइट) या कॅटेगरीमध्ये रौप्य पदक मिळवले, तसेच 13 वर्षीय वयोगटात सोलो क्रियेटीव्हिटी मध्ये कांस्य पदकाची कामाई केली. त्यामुळे २४ नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेश येथे पार पडणाऱ्या राष्ट्रीय पेंचाक सिलाट स्पर्धेत अंबरनाथचा अथर्व हा देशपातळीवर आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करून अंबरनाथ शहराचे नाव देशपातळीवर पोहचवणार असल्याने ही बाब अंबरनाथकारांसाठी अभिमानाची ठरणार आहे.