कल्याण - त्याचा विरोधात विविध पोलिस ठाण्यात तब्बल ४१ गुन्हे दाखळ आहेत. तो पसार होता. अखेर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी त्याला जेरबंद केले आहे. अटक करण्यात आलेल्या सराईत चोरटय़ाचे नाव गुलाम अली सरताज अली जाफरी उर्फ नादर असे आहे. तो मोहने परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खडकपाडा पोलिसांनी सापळा रचून त्याला आंबिवली येथील इराणी वस्तीतून अटक केली आहे. अटक आरोपीच्या विरोधात वसई, विरार, नाशिक, पुणे, गुजरात, ठाणे, नवी मुंबई, दादर याठिकाणी चोरी आणि फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.
अटक करण्यात आलेला चोरटा हा सराईत गुन्हेगार असून तो बतावणी करण्यात पटाईत आहे. बतावणी करुन तो कोणालीही फशी पाडतो. गेल्या दोन वर्षात त्याने विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४१ चोरी आणि फसवणूकीचे प्रकार केले आहेत.
आंबिवली येथील इराणी वस्ती ही कुप्रसिद्ध आहे. या वस्तीतून अनेक सराईत चोरटय़ांना पोलिसांनी अटक केलेली आहे. यापूर्वीही पोलिसांनी या वस्तीत कोंबिंग ऑपरेशन करुन चोरटय़ांचा बंदोबस्त केला आहे. काही वेळेस चोरटय़ांना जेरबंद करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या गाडय़ांवर दगडफेकीचे प्रकार घडले आहे. या दगडफेकीत चोरटे पसार झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. याशिवाय काही चोरटय़ांनी आत्मदहन करुन पोलिसांना चावा घेतल्याचा आणि मारहाण केल्याचा प्रकारही या वस्ती घडला आहे. या वस्तीत हा चाेरटा येणार असल्याची खबर पाेलिसांना मिळाली हाेती. पाेलिसांनी माेठ्या शिताफीने सापळा रचून त्याला पकडले आहे. कल्याणच्या खडकपाडा पाेलिस ठाण्यातही या चाेरट्याच्या विराेधात गुन्हा दाखळ आहे. या चाेरी प्रकरणी हा चाेरटा पाेलिसांना हवा हाेता.