शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

सम्राट अशोक विद्यालयाचे वार्षिक विज्ञान प्रदर्शन संपन्न

By सचिन सागरे | Published: December 24, 2023 5:26 PM

शास्त्रज्ञ अभय यावलकर आणि कुस्तीपटू वैष्णवी पाटील यांच्या हस्ते झाले उद्‌घाटन.

कल्याण :  पूर्वेकडील पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक इंग्रजी व मराठी माध्यम विद्यालयाचे वार्षिक विज्ञान, रांगोळी, हस्तकला, चित्रकला प्रदर्शनात इयत्ता १ ली ने १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपली कला सादर केली. प्रदर्शनाचे उद्‌घाटन शास्त्रज्ञ अभय यावलकर आणि इंटरनॅशनल कुस्तीपटू वैष्णवी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्‌घाटनाच्या प्रारंभी देशाचे माजी राष्ट्रपती तथा मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करून आणि प्रतिकात्मक चांद्रयान आकाशात सोडून या महान व्यक्तींना अभिवादन करण्यात आले.

शास्त्रज्ञ अभय यावलकर  यांनी वैज्ञानिक प्रकल्पांचे अवलोकन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. उपस्थित विद्यार्थ्यांना वैद्यानिक प्रयोग करून दाखवत आपल्या दैनंदीन जिवनातही काही वैज्ञानिक गोष्टी नकळत घडत असतात हे प्रयोगातून दाखविले. प्रत्येक कृती आणि घटनेकडे वैद्यानिक दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे असे सांगितले.

दोन दिवस चाललेल्या प्रदर्शनास पालक विद्यार्थ्यांसह आमदार गणपत गायकवाड, संस्थेच्या संचालिका गौतमी धनविजय, उद्योगपती संजय गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड, राष्ट्रीय विचार प्रबोधनीचे अध्यक्ष दिवाकर गोळपकर, आदर्श ह्यूमन राइटचे अध्यक्ष संजय शिर्के,  राजेश अंकुश व मनीलाल शिंपी अशा मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

उपस्थित मान्यवरांचा परिचय माध्यमिक विभागाचे मुध्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी करून दिला तर उपस्थितांचा सन्मान आणि सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पी. टी. धनविजय यांनी केला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन गणेश पाटील यांनी केले. तर आभार संतोष कदम यांनी मानले. प्रदर्शनास विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचा मोठा प्रतिसाद लाभला.

टॅग्स :kalyanकल्याण