कल्याण- कल्याण शीळ मार्गाला लागून असलेल्या टाटा नाका येथील देशमुख होम्समधील नागरीकांना पुन्हा पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे गेल्या पंधरा दिवसापासून त्यांच्या घरी पाणी येत नसल्याने संतप्त महिलांनी आज डोंबिवली एमआयडीसी कार्यालया गाठले. पाणी का येत नाही असा जाब कार्यकारी अभियंत्यांना विचारला. देशमुख होम्सला पाणी आले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
देशमुख होम्समध्ये १३२० सदनिका आहे. त्याठिकाणी १९ इमारती आहे. देशमुख होम्सच्या नागरीकांना पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षापासून भेडसावत आहे. मध्यंतरीच्या काळात या पाणी टंचाईची दखल घेत जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले. हे काम केल्यावर त्याठिकाणी पाणी पुरवठा सुरळित झाला होता. मात्र गेल्या पंधरा दिवसापूर्वी काही तांत्रिक कामाकरीता पाणी पुरवठयाचा शट डाऊन घेण्यात आला. तेव्हापासून पुन्हा पाणी पुरवठा अनियमित झाला. पाण्याचा दाब कमी झाला.
गेल्या पंधरा दिवसापासून या ठिकाणचे नागरीकांना पाणी पुरेसे मिळत नाही. पाणी टंचाईच्या विरोधात महिलांनी डोंबिवली एमआयडीसी कार्यालय गाठले. त्याचवेळी महिलांनी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांना यांच्याशी संपर्क साधला. घरत यांनी एमआयडीसी अधिकारी कार्यालयात धाव घेतली. घरत यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्याशी कार्यकारी अभियंत्याचे बोलणो करुन दिले. देशमुख होम्सच्या पाण्याची समस्या सुटली नाही. तर मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार पाटील यांनी कार्यकारी अभियंत्याना दिला आहे. कारण जसा उन्हाळा वाढत जाईल तसे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पाणी टंचाईची समस्या वाढत जाणार. त्यावर त्या आधीच तोडगा काढला पाहिजे याकडे आमदारांनी एमआयडीसीचे लक्ष वेधले आहे. दीड महिन्यापूर्वी जे नियम पाळले जात होते. त्याच प्रमाणो एमआयडीसीने पाणी पुरवठा करावा. एमआयडीसी अधिका:यांनी १.१० केजीचा पाणी प्रेशर राखण्याचे आश्वासन दिले आहे.