कल्याण: मध्य रेल्वेचा मुंबई विभाग हा मोठा अपघात झाल्यास विविध (विभागाची) भागधारकांची सतर्कता आणि प्रतिसाद वेळ तपासण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलासह (एनडीआरएफ) संयुक्त कवायती आयोजित करत असतात. या पार्श्वभूमीवर कल्याण यार्ड येथे कवायती करण्यात आल्या.
जळत्या डब्यात अडकलेल्या प्रवाशांच्या कृत्रिम अपघाताची परिस्थिती तयार करण्यात आली. एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वेच्या अपघात निवारण ट्रेनला संदेश देण्यात आला. एनडीआरएफ घटनास्थळी १०.४५ वाजता पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले. डबावरून आणि खिडक्यांमधून कापला गेला आणि नंतर प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ जवान स्वतः डब्यात घुसले.
आग विझवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्रांचा वापर केला. रेल्वे रुग्णवाहिका १०.५८ वाजता घटनास्थळी पोहोचली आणि अग्निशमन दल ११.०५ वाजता आले. रेल्वे संरक्षण दलानेही ड्रिलमध्ये भाग घेतला आणि प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला मदत केली. अग्निशमन दलाच्या जवानांनी डब्यात शिरून आग पूर्णपणे विझवली.
सर्व प्रवाशांना ११.३० वाजता बाहेर काढण्यात आले आणि जखमींवर प्रथमोपचार करण्यात आले आणि घटनास्थळी दाखल झालेल्या रेल्वे डॉक्टरांनी त्यांच्या आरोग्याचे निकष देखील तपासले. सर्व संबधीत (भागधारक) प्रतिसाद देणारे आणि जलद असल्याचे दिसून आले. तासाभरात संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आली. या कवायतींमुळे विविध आपत्ती प्रतिसाद एजन्सींसह रेल्वेचे संयुक्त ऑपरेशन सुरळीत होते आणि वास्तविक जीवनात मोठ्या प्रमाणात मदत होते अस रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. यावेळी शशांक मेहरोत्रा( मुख्य वैद्यकीय अधीक्षक, कल्याण रेल्वे रूग्णालय) , रॉबिन कालिया(वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी) , डॉ ए के सिंह( वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी) आणि इतर रेल्वे अधिकारी यावेळी उपस्थित होते.