शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

खोके बंद झाल्याने खोक्याचा जप सुरू, डॉ. श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 6:37 AM

कल्याण आणि भिवंडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शनिवारी अत्रे रंगमंदिरात केले होेते. यावेळी खासदार शिंदे यांनी ही टीका केली.

कल्याण : ‘आधी खाेके यायचे, ते येणे बंद झाल्यानेच आता खाेक्यांचा जप केला जात आहे,’ अशी टीका कल्याणचे खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कल्याण आणि भिवंडी येथील शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन शनिवारी अत्रे रंगमंदिरात केले होेते. यावेळी खासदार शिंदे यांनी ही टीका केली. आमदार विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, शहरप्रमुख रवी पाटील आदी  यावेळी उपस्थित होते. शिंदे म्हणाले की, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १८ ते २० तास अहोरात्र काम करून संघटना वाढविली. पक्ष संघटना वाढविण्यासाठी त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे. त्यांच्यामुळे राज्यातील विकासकामांना मोठा निधी उपलब्ध करून दिला जात आहे.  अडीच वर्षे विकासकामे ठप्प होती. ११ महिन्यांत विद्यमान सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली आहे,’ असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.‘लोकांना विकास हवा हाेता. मात्र, ते नाइट लाइफ देण्यावर ठाम होेते,’ अशी टीका शिंदे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर केली. ‘कोरोना काळात युवराजांना भेटण्यासाठी गेलो, तेव्हा कोराेना किट घेऊन आले. कोराेना टेस्ट निगेटिव्ह आल्यावर ते आम्हाला भेटले.’ हा किस्सा सांगून युवराजांची भेट होणे किती अवघड होते, यावर शिंदे यांनी लक्ष वेधले.

‘लावालाव्या करण्याचे काम’शिवसेना-भाजप युतीत मनोमिलन झाले का? असा सवाल खासदार शिंदे यांना विचारला असता, त्यांनी सांगितले की, ही युती एका वेगळ्या विचारांनी झालेली आहे. युतीत छोट्या कारणांमुळे वित्तुष्ट येणार नाही. विरोधकांना काही काम उरलेले नाही. त्यांचा दिवस लावालाव्या करण्यात जातो. १९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. तो साजरा करण्यासाठी शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.

टॅग्स :Shrikant Shindeश्रीकांत शिंदे