शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
5
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
6
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
7
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
8
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
9
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
10
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
11
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
12
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
13
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
14
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
15
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
16
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
17
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
18
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
20
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात

टेम्पोचा कारला धक्का लागला म्हणून कार चालकाचा दोघांवर प्राणघातक हल्ला

By प्रशांत माने | Published: September 15, 2022 8:55 PM

दोघांपैकी एकाचा मृत्यू.

डोंबिवली: टेम्पोचा कारला धक्का लागला म्हणून कारचालकाने दोघांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री पावणेनऊच्या दरम्यान सोनारपाडा, शंकरानगर येथे घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोघांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते त्यातील एकाचा आज पहाटे मृत्यू झाला. विकास मिश्रा असे त्याचे नाव आहे. हल्ला करणारा कारचालक पंडीत म्हात्रे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली असून तो सध्या पोलिस कोठडीत आहे.उंबार्ली परिसरात राहणारे हर्षद रसाळ यांचा मंडप डेकोरेशनचा व्यवसाय आहे. त्यांचे काका बंडू रसाळ हे रविवारी रात्री सोनारपाडा शंकरानगर येथे टेम्पोतून मंडप डेकोरेशनचे सामान घेऊन जात होते. तेव्हा त्यांच्या टेम्पोचा अन्य एका कारला धक्का लागला. या कारणावरून कारचालक पंडित म्हात्रे यांनी वाद घालायला सुरूवात केली. यावेळी म्हात्रे आणि त्याच्या साथीदारांनी टेम्पोत असलेल्या हर्षद रसाळ आणि अन्य एकाला शिवीगाळी करीत मारहाण केली. मारहाण करणारे त्यावरच थांबले नाहीत तर म्हात्रे यांनी हर्षदच्या पोटावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.

यावेळी त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. त्यातील विकास मिश्रा हा हर्षदला सोडविण्यासाठी पुढे आला असता त्याच्यावर देखील वार करण्यात आले होते. यात विकास देखील गंभीर जखमी झाला होता. दोघा जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज पहाटे चार वाजता मिश्राचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मानपाडा पोलिसांनी आता या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.