कल्याण: कल्याण-टिटवाळा रस्त्या दरम्यान बल्याणी रस्त्यांची दुरावस्था झाली होती. हा रस्ता आत्ता चकाचक होणार आहे. या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कल्याण पश्चिमचे शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते काल सायंकाळी करण्यात आला.
या भागाचे स्थानिक माजी नगरसेवक मयूर पाटील आणि नमिता पाटील यांनी या रस्त्याच्या कामासाठी ९ कोटी २४ लाखाचा निधी मंजूर करुन घेतला आहे. महापालिकेच्या निधीतून या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. बल्याणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते माता मंदिर्पयत हा रस्ता तयार करण्यात येणार आहे. रस्त्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी आमदार भोईर यांचे सहकार्य लाभले. या रस्त्यासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र कोरोना काळात विकास काम होऊ शकले नाही. या रस्त्याच्या कामाकरीता भाजपने दोन दिवसापूर्वीच रास्ता रोको आंदोलन केले होते.
मात्र रस्त्याचे काम मंजूर असताना तसेच त्याचा शुभारंभ होणार असल्याचे माहित असल्याने केवळ श्रेय घेण्याकरीता विरोधकांनी आंदोलन करुन केवळ राजकीय स्टंटबाजी केली असल्याचा आरोप माजी नगरसेवक पाटील यांनी यावेळी केला. विरोधकांनी कितीही स्टंटबाजी केली तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे आहे. कल्याण पश्चिमेचा विकास त्यांच्या नेतृत्वाखाली होणार असल्याचा विश्वास आमदार भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.
लवकरच कार्यकारीणी जाहिर केली जाणार
कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात शिंदे गटाची कार्यकारीणी अद्याप घोषित झालेली नाही. त्यामुळे कार्यकत्र्यामध्ये संभ्रमाचीस्थिती आहे. शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, शहर प्रमुख पदासाठी अनेक जण इच्छूक आहे. कार्यकारीणी जाहिर न झाल्याने कार्यकत्र्याच्या मनात अनेक प्रश्न आहे. ठाकरे गटाने शहर प्रमुख पदाची घोषणा केल्यानंतर अद्याप शिंदे गटाकडून शहर प्रमुखाची घोषणा केली गेली नाही. लवकरात लवकर ही घोषणा केली जावी अशी शिंदे गटाची आपेक्षा आहे. आमदार भोईर यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. काही एक संभ्रमाची परिस्थिती नाही. दसरा मेळाव्यात ज्यांना बीकेसीवर जायचे होते. ते बीकेसीवर आले. ज्यांनी शिवतिर्थावर जायचे होते. त्या ठिकाणी गेले. आज बैठक आहे. आज बैठकीत निष्पन्न होईल. साधरणत: आठवडा भरात शिंदे गटाची कार्यकारीणीही जाहिर होईल असे भोईर यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"