कल्याण-बिहारमध्ये बोलली जाणाऱ्या मगई भाषामुळे कल्याण आरपीएफने ९ महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाला त्याचा कुटुंबियांची भेट घालून दिली आहे. अर्जून कुमार नावाच्या १९ वर्षीय तरुण हिमाचल प्रदेशातून बिहार येत असताना मुंबईला आला. त्याची मानसिक स्थिती ठिक नसल्याने तो कुठे निघाला आणि कुठे जात आहे. याचा त्याला थांगपत्ता नव्हता.
कल्याण रेल्वे परिसरात एक तरुण मळकट फाटलेल्या कपड्यात फिरत होता. कधी कोणाकडून दहा रुपये घ्यायचा. कोणाकडून पाणी मागून तहान भागवित होता. कधी कोणाकडून जेवण मागत होता. रेल्वे कॉलनीतील लोक त्याची परिस्थिती पाहून त्याला जेवण, पैसे, पाणी देत होते. कॉलनीतील एका व्यक्तीने आरपीएफच्या वरिष्ठ अधिकारी रिषी शुक्ला यांना त्याचा फोटा पाठविला. शुक्ला यांनी हा फोटो कल्याण आरपीएफचा इन्चार्ज राकेश कुमार यांना पाठविला.
राकेश कुमार यांनी या तरुणाला आरपीएफ कार्यालयात आणले. राकेश कुमार हे बिहारचे असल्याने त्याना माहिती पडले की, हा तरुण फक्त त्याचे नाव सांगतो. तो बिहारमध्ये पटणा शहराच्या आजूबाजूला बोलली जाणारी मगई भाषा बोलतोय. यानंतर राकेश कुमार यांनी ज्या परिसरात मगई भाषा बोलली जाते. त्या भागातील १४ पोलिस अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन संपर्क साधला. त्या तरुणाचे फोटो पाठविले. राकेश कुमार यांना माहिती मिळाली की, बिहारमधील दुल्हीन ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात राहणारा गनौरी माेची याचा हा मुलगा आहे. ज्याची मानस्थिक स्थिती ठिक नाही.गनौरी हा हिमाचल प्रदेशला एका मोठ्या कंपनीत गार्डचे काम करतो. राकेश कुमार याने हिमाचलमध्ये राहणाऱ्या गनौरी मोची यांना संपर्क साधला. गनौरी यांनी सांगितले की, अर्जून हा माझा मुलगा आहे. त्याला घेण्यासाठी त्यांनी थेट कल्याण गाठले. आपल्या मुलाला पाहून त्यांना आनंदाचे अश्रू अनावर झाले. गनौरी म्हणाले की, माझा मुलाची मानसिक स्थिती ठिक नाही. तो माझ्याबरोबर हिमाचल प्रदेशात राहत होता. त्याची इच्छाझाली की घरी जाऊन शेती करणार. तो एकटा निघून गेला. ९ महिन्यांनी मला माझा मुलगा मिळाला. मी आरपीएफसह सगळ्यांचे आभार मानतो.