कल्याण- बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडीवर देवीच्या पूजेकरीता हिंदू भाविकांना मज्जाव केला जातो. हिंदू भाविकांनी देवीच्या दर्शनाला जाऊ द्यावे यासाठी शिवसेनेच्या वतीने बकरी ईदच्या दिवशी घंटानाद आंदोलन केले जाते. आजही आंदोलन करण्यात आले. मात्र हे आंदोलन आधी शिंदे गटाच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाकडून हे आंदोलन करण्यात आले. दोन्ही गटाकडून बकरी ईदच्या दिवशी देवीच्या पूजेचा अधिकार नाकारण्यात येऊ अशी मागणी करण्यात आली. शिवसेनेच्या फूटीनंतर प्रथम शिवसेनेकडून एकाच मुद्यावर दोन गटांची आंदोलने झाली.
किल्ले दुर्गाडी आणि देवीचे मंदीर हे जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येते. बकरी ईदच्या दिवशी किल्ले दुर्गाडी येथे मुस्लिम धर्मीय नमाज पठण करता. याच वेळी हिंदंना मंदीर प्रवेश नाकारला जातो. मंदीर प्रवेश मिळावा याकरीता शिवसेना जिल्हा प्रमुख आनंद दि्घे यांनी घंटानाद आंदोलन सुरु केले. हे आंदोलन शिवसेनेकडून आजही केले जाते. आज शिंदे गटाकडून आधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, आमदार विश्वनाथ भोईर, शहर प्रमुख रवी पाटील, अरविंद मोरे, अरुण आशाण, राजेश मोरे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दरम्यान ठाकरे गटाच्या वतीनेही घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी आमदार रुपेश म्हात्रे यांच्यासह जिल्हा प्रमुख विजय साळवी, शहर प्रमुख सचिन बासरे, रविंद्र कपोते, चंद्रकांत बोडारे आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. दोन्ही गटाकडून आंदोलन होणार असल्याने दुर्गाडी परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलनानंतर पोलिसांनी दोन्ही गटाच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांना ताब्यात घेतले. काही वेळेनंतर त्यांची सुटका करण्यात आली.