कल्याण - कल्याणच्या वाडेघर येथील डम्पिंग ग्राऊंडला मोठी आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रात्री 9 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. खाडीच्या दिशेने ही आग लागलेली आहे. (Big fire in dumping ground in Kalyan )
केडीएमसीच्या पाच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह चार टँकर घटनास्थळी आग विझविण्याचे काम करीत असून वा-यामुळे आग इतरत्र पसरली असून धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात आधारवाडी डपिंग ग्राउंड ला आग लागते. यंदाही हे सत्र सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. कच-यामुळे निर्माण होणाऱ्या मिथेन वायू मुळे ही आग लागते. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु असल्याची माहिती कल्याण अग्निशमन दलाचे आधारवाडी स्थानक अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली. विशेष बाब म्हणजे डंपिंग च्या बाजूला सीएनजीचा प़प आहे. आग वा-यामुळे इतरत्र पसरत असल्याने पंप बंद करण्याच्या सूचना पंप चालकाला दिल्याची माहीतीही चौधरी यांनी दिली.