शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

मुंबईसह सर्व महापालिका भाजपा अन् बाळासाहेबांची शिवसेना जिंकणार; एकनाथ शिंदेंचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 12:47 PM

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील विविध विकास कामाचं यावेळी लोकार्पण करण्यात आले. 

राज्याच्या डबल इंजिनच्या सरकारला मुंबईसह कल्याण आणि सर्व महापालिकांचे डब्बे जोडले जाणार आणि ही एक्सप्रेस तुफान गतीने धावेल, असं म्हणतं मुंबईसह सगळ्या महापालिका भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना जिंकेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणच्या सभेमध्ये बोलून दाखवला. 

भगवा तलावाचे सुशोभिकरण आणि मलशुद्धीकरण केंद्र आंबिवली, मलशुध्दीकरण केंद्र वाडेघर आणि बी.एस.यु.पी. अंतर्गत बांधलेल्या सदनिकांचे प्रकल्पबाधितांना वाटप, अशा विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी एकनाथ शिंदेंनी नागरिकांशी संवाद साधला.

कल्याणसाठी स्वतंत्र धरणाची जी मागणी होत आहे, त्यासाठी काळू धरणासाठी राज्य सरकारने ४१० कोटींचा निधी फॉरेस्टला दिला असून लवकरच या धरणाची प्रक्रिया देखील पूर्ण होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्याचबरोबर, तसेच कल्याणमध्ये मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारा राज्य सरकार मदत करेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलावून दाखवला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याणमधील विविध विकास कामाचं यावेळी लोकार्पण करण्यात आले. 

कल्याण हे ऐतिहासिक शहर असून या शहराच्या विकासासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही. कल्याण पश्चिम व कल्याण पूर्व येथे दोन सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल्स उभारावीत यासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू अशी ग्वाही दिली. तसेच कल्याणकरांची मेट्रोची मागणी मागणी लक्षात घेऊन मेट्रो१२ चा आराखडा तयार करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला दिल्या. चांगल्या घरात रहायला मिळावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते आज बीएसयुपी योजनेतील घरकुले ५०० कुटूंबाना देता आली याचे विशेष समाधान वाटत असल्याचे मनोगत यावेळी व्यक्त केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkalyanकल्याणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारElectionनिवडणूक