कल्याण - भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या वाढ दिवसांचे बॅनर काढणाऱ्या प्रभाग अधिकारी भरत पाटील यांना भर रस्त्यात आमदारांनी गाठून पुष्पगुच्छ देत सत्कार केला. तसेच कारवाईचे स्वागत करत झापलेही.आमदार गायकवाड यांचा १४ जून रोजी वाढदिवस होता. त्यांच्या शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले होते. हे बॅनर प्रभाग अधिकारी पाटील यांनी काढले. त्यांना आमदारांनी रस्त्यात गाठून त्यांनी केलेली कारवाई चांगली आहे. अशीच कारवाई अन्य ठिकाणी ही करावी असे सांगितले. सरकारी जागेवर बेकायदा बॅनर लावले गेले आहे. त्याविषयी तक्रारी करुन देखील त्या विरोधात कारवाई केली जात नाही. मात्र मी लावलेल्या बॅनरवर कारवाई करण्यात तत्परता दाखविली जाते. कारवाई करताना दुजाभाव केला जातो. कायदा फक्त आमदार गणपत गायकवाड यांच्यासाठी आणि बाकीच्यासाठी नाही का असा संतप्त सवाल आमदार गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.या मागे शिवसेना आहे का असा सवाल आमदार गायकवाड यांना विचारला असता त्यांनी सांगितले की, कालच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विषय संपविला आहे. स्थानिक पातळीवर काही कार्यकर्ते भाजपचे वर्चस्व वाढू देत नाहीत. यामागे अदृश्य शक्तीच आहे. ज्या सरकारी इमारतीवर ब’नर लागले जातात. ते काढले जात नाहीत. तीच शक्ती या मागे असू शकते हा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला आहे.
भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी वाढदिवसाचे बॅनर काढणाऱ््या अधिकाऱ््याचा केला सत्कार, म्हणाले...
By मुरलीधर भवार | Published: June 16, 2023 5:28 PM