डोंबिवली-डोंबिवलीला बदनाम करण्यासाठी ब्लॅक आऊट आंदोलन केले जाणार आहे. काही विघ्नसंतोषी लोक त्याच्या मागे आहे. त्यांना विकासाची दृष्टी नाही. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सुरु असलेली विकासाची घोडदौड अशीच सुरु राहणार असा टोला युवासेना नेते दीपेश म्हात्रे यांनी विरोधकांना लगावला आहे.
डोंबिवलीत आज रात्री नागरीक असुविधांच्या विरोधात रात्री आठ ते आठ वाजून पाच मिनिटार्पयत काही नागरीक ब्लॅक आऊट करणार आहे. या आंदोलनाचा मेसेज सोशल मिडियावर फिरत आहे. काही नागरीक अप्पा दातार चौकात जमून त्याठिकाणी घंटानाद आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाला मनसेचा देखील पाठींबा आहे. मनसे आमदार राजू पाटील हे सातत्याने रखडलेल्या विकास कामांबाबत सत्ताधा:यांवर टिका करीत आहेत. या आंदोलनाला भाजप देखील छुपा पाठिंबा देत असल्याची सूत्रंची माहिती आहे.
कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात शिंदे विरुद्ध रविंद्र चव्हाण-राजू पाटील या तिघांमध्ये राजकीय संघर्ष दिसून येतो. या राजकारणाचा हा भाग असल्याचे बोलले जात आहे. या बाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांनी डोंबिवली येथील खासदारांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत युवा सेना नेते दिपेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, शहर प्रमुख राजेश मोरे , बंडू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शहर प्रमुख राजेश मोरे यांनी मनसे आमदार हे केवळ ट्वीटर आमदार आहे. विरोधकांना टिका करण्याशिवाय काही एक काम नसते. त्यांनी विकास कामे काय झालेली आहेत. हे देखील पाहावे. एखादे चांगले ट्वीट देखील करावे असे आवाहन केले. ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी विकास कामे विरोधकांच्या डोळ्य़ात खुपत आहेत. रस्ते विकासासाठी निधी मंजूर करणो, पाणी योजना मार्गी लावणो, मोफत घरे हे निर्णय विरोधकांना दिसून येत नाहीत. राजेश कदम यांनी मनसे आमदारांनी रस्त्यावर उतरुन आंदोलने करावी. केवळ ट्वीटरवरुन टिका करण्यात काय उपयोग. दिवाळी रोषणाईचा संदेश आहे. त्यामुळे ब्लॅक आऊट आंदोलन करु नये असे आवाहन केले आहे.