डोंबिवली : कल्याणमधील के सी गांधी शाळेचे डोंबिवलीमधील चित्रकला शिक्षक अमोल पाटील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम राबवित असतात. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त ९ ते १५ऑगस्ट दरम्यान केंद्र शासनामार्फत आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमांतर्गत माझी माती, माझा देश. हे अभियान प्रत्येक राज्य, गावापासून शहरापर्यंत सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये राबविले जात आहे. त्या उपक्रमाचे महत्व लक्षात घेता विविध रंगीबेरंगी वृत्तपत्राच्या (पेपरच्या) छोट्या छोट्या असंख्य तुकड्यांपासून माझी माती, माझा देश. मातीला नमन वीरांना वंदन अमर जवान हे सुदंर व आकर्षक कोलाज चित्र स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून साकारले.
विद्यार्थ्यांमध्ये या अभियानाची जनजागृती व्हावी आपल्या मातिविषयी जनजागृती, साक्षरता व देशाविषयी प्रेम देशभक्ती निर्माण व्हावी म्हणून रंगीत घोटीव, टिंटेड पेपर, वृत्तपत्रातील, विविध मासिक यातील रंगीत भाग संकलित करून ते चित्र त्यांनी साकारले. सलग ४ तास बसून हे कोलाज चित्र तयार केले तसेच विद्यार्थ्यांना शालेय प्रकलपासाठी सुद्धा अशाप्रकारचे विषय देऊन कोलाज चित्र तयार करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केले. सतत मोबाईल, लॅपटॉप इंरनेट, संगणकीय गेम यात सध्या मुले अडकली आहे अशाप्रकारची कोलाज चित्र विद्यार्थ्यांनी केली तर नक्कीच त्यांची कार्यकुशलता, कलागुण, एकाग्रता, कला कौशल्य वाढीस लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.