अनिकेत घमंडी/ डोंबिवली: एलटीटी गोरखपूर मार्गावर जाणाऱ्या गोरखपूर एक्स्प्रेस गाडीच्या एका डब्याच्या ब्रेक लायनरला आग लागल्याची घटना सोमवारी पहाटे ६:३० वाजता ठाकुर्ली स्थानकात घडली. त्या घटनेमुळे प्रवाशांनी घाबरून गाडी थांबताच डब्यातून उतरून स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य दिले, सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला.मात्र या घटनेमुळे सकाळच्या पहिल्या सत्रातील लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती. विशेषतः डाऊन जलद मार्गवरील वाहतूक प्रभावित झाली होती. घटनेनंतर काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवून गाडी कल्याणच्या दिशेने गेली आणि तेथून पुढे गेल्याची माहिती रेल्वेने दिली.
अशा पद्धतीने गाडी बंद पडल्यास रेल्वे ट्रॅकमध्ये उतरताना प्रवाशांनी काळजी घ्यायला हवी, कारण कर तसे।केले नाही तर मात्र मोठ्या अपघाताची शक्यता आहे, त्यामुळे एकीकडे सुरक्षितता जपताना दुसरीकडे जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रवासी संघटनांनी केले आहे.
शनिवारी अचानक पणे अंबरनाथ बदलापूर मार्गावर अचानक मालगाडी फेल झाल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.लांबपल्याच्या गाड्यांचा बिघाड हा लोकल।सेवेवर मनस्ताप होऊ।लागला आहे, त्यावर प्रभावी उपाययोजना करून कल्याण यार्डचे रिमॉडेलिंगवर भर देऊन समस्या निकाली काढणे गरजेचे आहे. लांबपल्याच्या गाड्या कल्याण।पुढे आल्या नाहीत तर लोकल सेवेला पूर्ण मोकळीक मिळेल आणि त्यामुळे गतिमान प्रवास अनुभवता येईल असे उपनगरी प्रवाशांचे म्हणणे आहे.
सोमवारच्या गोंधळामुळे उपनगरी लोकल सेवेवर परिणाम।झाला आणि बदलापूर, कल्याण, डोंबिवली, दिवा स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने आठवड्याचा प्रवास वेळेत होईल कामावर वेळेत जाता येईल असे प्रवाशांना वाटले होते, मात्र सकाळीच या अपघातामुळे प्रवाशांना गर्दीतच प्रवास करावा लागला.