शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधींच्या खंडणीसाठी बिल्डरच्या मुलाचे अपहरण; १२ तासांत १० जणांच्या टोळीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 08:16 IST

व्यावसायिकाच्या मुलाचे ४० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना

अंबरनाथ : येथील बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाचे ४० कोटींच्या खंडणीसाठी अपहरण केल्याची घटना घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या १२ तासांत मुद्देमाल, टोळीतील म्होरक्या देवीदास वाघमारे, दत्तात्रय पवार यांच्यासह आठ जणांना गजाआड केले. मुलाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले. 

अंबरनाथ येथील बांधकाम व्यावसायिक  संजय शेळके यांच्या २० वर्षीय मुलाचे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास काही अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले होते. आरोपींनी कार आडवी घालून मुलाला गाडीत घालून त्याचे अपहरण केले. त्यानंतर शेळके यांच्याकडे मोबाइलवरून ४० कोटींच्या खंडणीची मागणी केली. खंडणी न दिल्यास मुलाला मारण्याची धमकीही दिली होती. दोन कोटी एका कारमध्ये ठेवून त्या कारचा नंबर पाठवण्यासही शेळके यांना सांगितले. कारच्या पाठोपाठ पोलिस पाठलाग  करत  होते. मात्र, पोलिस असल्याचा संशय आल्याने मुलगा काही वेळात परत येईल, असे सांगितले आणि मोबाइल बंद केला. 

पैसे परत करण्यासाठी रचला अपहरणाचा कट

त्यातील वाघमारे आणि पवार यांनी मुंबई पालिकेत अग्निशमन दलात नोकरभरतीमध्ये अनेक तरुणांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आठ ते दहा लाख याप्रमाणे दोन कोटी ७५ लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली होती. उमेदवारांचे घेतलेले पैसे परत करण्यासाठी त्यांनी शेळके यांच्या मुलाच्या अपहरणाचा कट रचला होता.  

मुलाची सुखरूप केली सुटका 

अपहरणकर्ते खंडणीची रक्कम न घेताच निघून गेल्याने घटनेचे गांभीर्य वाढले. याचवेळी अपहरणकर्त्यानी वापरलेल्या मोबाइल नंबरचा तांत्रिक तपास केला. लोकेशन भिवंडीजवळील पिसे डॅमजवळ असल्याचे आढळले. निखिल लबाना याला ताब्यात घेऊन विचारणा केली. त्यानंतर  तपासाची सूत्रे वेगाने फिरली आणि अपहरण प्रकरणातील दहा जणांना अटक केली.  

टॅग्स :ambernathअंबरनाथCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस