सदानंद नाईक, उल्हासनगर : विधानसभा निवडणूकीच्या दिवासी पप्पू कलानी हे समर्थकासह आमदार आयलानी यांच्या संपर्क कार्यालया समोर जात हातवारे केले होते. याबाबत आयलानी यांनी तक्रार केल्यानंतर उल्हासनगर पोलिसांनी कलानी यांच्यासह तब्बल २१ जणावर गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर मतदारसंघात ओमी कलानी व कुमार आयलानी यांच्या मुख्य लढत होती. मतदानाच्या दिवासी दुपारी आयलानी यांच्या संपर्क कार्यालयात महिलांनी एकच गर्दी झाली होती. महिलांना पैशाचे वाटप होत असल्याची माहिती प्रथम मनसेचे उमेदवार भगवान भालेराव यांना मिळाल्यावर त्यांनी आयलानी यांच्या कार्यालयावर जाऊन जाब विचारला. भालेराव पाठोपाठ पप्पू कलानी हे समर्थकासह आयलानी यांच्या कार्यालयावर धडक देऊन, आयलानी यांची मेव्हणी मोना नायर यांच्या सोबत बाचाबाची झाली. तसेच आयलानी यांच्याकडे हातवारे करून जाताना इशारा केला. याप्रकारानंतर आयलानी यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्यासह निवडणूक आयुक्ताकडे तक्रार केली होती.
आमदार कुमार आयलानी यांच्या तक्रारीची दखल घेत उल्हासनगर पोलिसांनी पप्पू कलानी यांच्यासह २१ जणा विरोधात गुन्हा दाखल झाला. कलानी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर, पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले. तसेच आयलानी व कलानी यांच्यातील विरोधीची दरार वाढणार असल्याचे बोलले जात आहे.