डोंबिवली-कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वतीने डोंबिवलीत नवरात्री निमित्त आयोजित करण्यात आलेल्या रासरंग कार्यक्रमस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट देणार आहेत. यासंदर्भात खासदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. तसेच त्यांना या रासरंग कार्यक्रमाचे आमंत्रणही दिले.
यावेळी डोंबिवली शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, राजेश कदम, गजानन व्यापारी, राजू शिंदे आणि नवदुर्गा मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोनामुळे रासरंगचे आयोजन केले गेले नव्हते. आत्ता कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने यंदा रासरंग मोठ्या उत्साहात आजपासून येत्या ४ ऑक्टोबर्पयत संपन्न होणार आहे.
दरवर्षी या कार्यक्रमात एक लाखापेक्षा जास्त लोक हजेरी लावता. मराठी भोंडला आणि गुजराती गरब्याचा मिलाप या ठिकाणी असतो. मराठी, हिंदी सिने, नाट्य आणि टीव्ही विश्वातील अनेक प्रसिद्ध, कलाकार, गायक, गीतकार, संगीतकार हजेरी लावत असतात. या नऊ दिवसात तुषार सोनिग्रा यांच्या बिट सोळाचे वाद्यवृंद कार्यक्र मात संगीत संयोजन करतील. तर अर्चना महाजन, दिलेश दोषी, सेजल शहा, पंकज कक्कड, धर्मेश जोशी, कौशिक गाडा या कलावंताचे सादरीकरण होणार असून त्याला प्रसिद्ध निवेदिका शलाका हिच्या सुत्नसंचालनाची जोड मिळणार आहे.
डोंबिवलीतील रासरंग कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरीकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन खासदार शिंदे यांनी केले आहे. या निमित्त विविध स्पर्धा होणार असून आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत.