डोंबिवली: पूर्वेकडील शेलार नाका परिसरात अनेक दिवसांपासून पाणी येत नसल्याने संतप्त नागरिकांनी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना मंगळवारी घेराव घातला.
आम्ही पावसाचे पाणी पिऊन जिवंत रहायचे का? पाऊसही येत नाही आणि प्यायला पाणीही नाही अशी गंभीर स्थिती आहे. त्या आंदोलनात एका ज्येष्ठ महिलेला चक्कर आल्याने त्यांना जवळील दवाखान्यात नेण्यात आले. त्यावेळी भाजपचे कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे आणि डोंबिवली शहर पूर्व मंडळ उपाध्यक्ष राजू शेख यांनी पालिका पाणी पुरवठा डोंबिवली विभाग अधिकारी चंद्रकांत पाखले यांना जाब विचारीत जोवर येथील नागरिकांना पाणी मिळत नाही तोवर आपल्याला येथून जाऊ देणार नाही असा इशारा दिला. तसेच महापालिका मुख्यालयात हजारो नागरिकांना घेऊन ठिय्या आंदोलन करू असे सांगितले. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीही महापालिका आयुकत डॉ इंदुराणी जाखड यांच्याशी चर्चा असून येथील पाणी समस्या दूर करू असा असे आदेश दिल्याचे कांबळे म्हणाले.