डोंबिवली: नागरिकांना केंद्र सरकारच्या लाभदायी योजनांचा लाभ मिळाला आहे. त्या नागरिकांनी मिळालेल्या योजनेच्या नावाचा उल्लेख करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद मोदीजी या मजकुराचे पोस्टकार्ड लिहून मोदींचे आभार मानणारे पत्र नागरिकांच्या माध्यमातून पाठवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कल्याण जिल्ह्यातून १० हजार पत्र पाठवण्यात येणार असून रविवारी त्या उपक्रमांतर्गत ५ हजार पत्र पाठवण्यात आली आहेत.
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मिहीर देसाई यांनी सोमवारी ही माहिती देतांना सांगितले।की, भाजप कल्याण जिल्ह्यात डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ ह्या शहरांमध्ये युवा मोर्चा च्या माध्यमातून धन्यवाद मोदीजी या अभियानाची सुरुवात करण्यात आली असून त्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाजयुमोच्या वतीने रविवारी मेगा ड्राइव्ह घेण्यात आला. त्यात पाच हजारहुन अधिक पत्रे ह्या वेळेस नागरीकांनी उत्स्फूर्तपणे पाठवली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखाली असलेल्या केंद्र सरकारच्या माध्यमातून आठवर्षांपासून देशभरातील नागरिकांसाठी लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत.
सदर योजनेत गोर गरिबांना घराचे स्वप्न साकार व्हावे यासाठी केंद्राच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना, महिलांना चूल मुक्ती व्हावी यासाठी उज्वला गॅस योजना, सुशिक्षित बेरोजगारांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री कौशल विकास योजना, मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत, स्किल इंडिया, स्टॅन्ड अप इंडिया लोन योजना, प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी पंतप्रधान पीकविमा योजना, ग्राम सिंचाई योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना, कोविड काळात फळ विक्री व टपरी धारक यांना कुठल्याही प्रकारचे व्याज न घेता दहा हजार रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले. मोफत धान्य वितरण, मोफत लसीकरण, बेटी बचाव-बेटी पढाव, सुकन्या योजना, जीवन ज्योती विमा योजना, अटल पेंशन योजना, सुरक्षा विमा योजना यासारख्या अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविल्या जातात व नागरिक या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतांना दिसून येत आहे.
देशातील विविध समाजाच्या शेवटच्या घटकांला न्याय देण्याचे काम मोदींच्या नेतृत्वाने केले आहे. धन्यवाद मोदीजी हे अभियान राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून या अभियानांतर्गत पाच लाख लाभार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या हस्ताक्षरातील पाच लाख पत्रे पाठवले जाणार आहे. भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, मंडल अध्यक्ष अभिजित करंजुले, अभियान संयोजक पवन पाटील, युवामोर्चा जिल्हा प्रभारी रवी तिवारी, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष मितेश पेणकर, कृष्णा पाटील, संदीप पाटील, दुर्वेश राणा, जिल्हा पदाधिकारी स्वानंद भणगे, समीर दलाल, शैलेश देशपांडे व मंडल पदाधिकारी त्यात सहभागी झाले होते.