कल्याण- कल्याणडोंबिवली महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. मात्र शुक्रवारी शहरात एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नसल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे कोरोना मुक्तीकडे कल्याण डोंबिवली शहराची वाटचाल सुरू असल्याचं दिसून येतंय.
दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 13 मार्च 2020 रोजी केडीएमसी हद्दीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानं प्रशासनासह नागरिकांच्या पायाखालची जमिन सरकली होती. इतर शहरांप्रमाणे कल्याण डोंबिवली शहरात कोरोनाच्या तीन लाटा पाहायला मिळाल्या. पहिल्या लाटेत 500 च्या वर तर दुसऱ्या लाटेत हाच आकडा 2 हजार पार गेला होता. तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या जास्त असूनही त्याचा परिणाम जास्त झाला नाही. सध्या 18 रुग्ण कोरोनाचे उपचार घेत आहेत. आज रुग्णसंख्या शून्य असल्यानं कोरोना।शहरातून हद्दपार होण्याचा आशावाद निर्माण झालाय.