डोंबिवली: काही वर्षात दिवा रेल्वे स्थानकातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली दिवस स्थानकातील वाढती गर्दी लक्षात घेता, गर्दीचे नियोजन करणे असल्याने ही बाब लक्षात घेऊन दिवा स्थानकातील फलाट क्रमांक-१ वर नवीन दुतर्फा उतरण्यासाठी फलाट व्हावा यासाठी त्या नवीन फलाटाला रेल्वे प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली होती. सोमवारी त्या कामाचा शुभारंभ झाला असून पावसाळ्यापूर्वी नवीन फलाट होणार आहे.
दिवा पश्चिमेला रेल्वे हद्दीत नवीन शौचालय उभारवं व दिवा स्थानकात अपघात ग्रस्त प्रवाशाला तातडीची मदत मिळावी यासाठी वैद्यकीय कक्ष उभारावं अशी मागणी प्रवासी संघटनेने खासदार डॉ.श्रीकांत शिंदे व रेल्वे प्रशासनाकडे केली होती. ती मागणी मंजूर झाली असून लवकरच नवीन वैद्यकीय कक्ष आणि शौचालयाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे संघटनेचे अध्यक्ष ऍड. आदेश भगत यांनी दिली. मागील काही वर्षात रेल्वे कडून दिवा स्थानकात अनेक सुख-सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
दिवेकर रेल्वे प्रवाशांसाठी अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या दिवा रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी असलेली अनेक काम मार्गी लागली असून इतर कामांना सुरूवात झालेली आहे. दिवा स्थानकात सरकते जिने, पूर्वेला नवीन तिकीट घर, फलाट क्रमांक ५ व ६ शौचालय, सर्व फलाटांवर पाणपोई, पश्चिमेला तिकीट घरासमोर शेड असे अनेक कामे सुरू करण्यात आले आहेत, त्यामुळे दिवेकर रेल्वे प्रवाशांतर्फे दिवा रेल्वे प्रवासी संघटनेने शिंदे व मध्य रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त केले.