कल्याण : कल्याण पत्रीपुलाला जोडणारा ९० फुटी रस्त्याच्या विकासकामांत बाधित झालेल्या नागरिकांना त्यांचा मोबदला दिलेला नाही. बाधितांना मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी साेमवारी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आयुक्तांनी यासंदर्भात २७ नोव्हेंबरला बैठक घेणार आहे, असे आश्वासन आमदार पाटील यांना दिले.
पत्रीपुलाच्या गर्डरच्या लाॅंंचिंगवेळी २१ नोव्हेंबरला आ. पाटील हे कामाच्या ठिकाणी आले होते. तेव्हा त्यांनी ९० फुटी रस्त्याची पाहणी करून प्रकल्पबाधितांची भेट घेतली होती. आयुक्तांनी आमदारांना सोमवारी भेटीची वेळ दिली होती. त्यानुसार, बाधितांसह पाटील यांनी आयुक्तांची भेट घेतली. रस्त्यासाठी घरे रिकामी करणाऱ्या बाधितांना चार वर्षे उलटूनही पालिकेने मोबदला दिलेला नाही. यासंदर्भात तक्रारी पाटील यांच्याकडे आल्या होत्या. प्रकल्पबाधित नीशा डिसूजा यांनी आमदारांनी पुढाकार घेतल्याने आमच्या आशा पल्लवित झाल्याचे सांगितले.
खासदारांचे अभिनंदनगर्डर लॉंंचिंगचे काम पूर्ण केल्याबद्दल आमदार पाटील यांनी रेल्वे, राज्य रस्ते विकास महामंडळासह कर्मचारी अधिकारी आणि खासदारांचे अभिनंदन केले आहे. असेच काम करा. त्यामुळे आम्हाला कमी बोलावे लागेल, असे ते म्हणाले.