अनिकेत घमंडी/ डोंबिवली: कर्जतवरून मुंबईला जाणारी लोकल एरव्हीप्रमाणे सकाळी ७:५१ वाजण्याच्या सुमारास बदलापूर मध्ये आली, परंतु लोकल स्थानकात येताच त्या लोकलचे शेवटच्या दिशेकडील महिलांच्या डब्यांचे दरवाजे अचानक बंद केल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे लोकल।पकडण्याच्या नादात काही।महिला फलाटात पडल्या सुदैवाने अपघातात फारसे कोणी जखमी झाले नाही. मात्र त्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
ही ट्रेन कर्जत वरून येते, जशी ही लोकल प्लॅटफॉर्म ला लागली तसे महिलांच्या डब्याचे दरवाजे बंद केले गेले अशी माहिती उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे उपाध्यक्ष संजय मेस्त्री यांनी दिली. त्या बंद दरवाजमुळे स्थानकात काही महिला पडल्या, कोणीच चढू शकले नाही. ही दादागिरी योग्य नाही असे मेस्त्री म्हणाले. असंख्य प्रवासी बदलापूरला राहतात, तेथे खूप गाड्या आहेत म्हणून आम्ही ह्या ट्रेन ला चढायच नाही असा हेतू वांगणी आणि शेलु वाल्यांचा होता का असा सवाल त्यांनी केला.
मंगळवारच्या घटनेत लोकल चालू झाली आणि ज्या महिला आत होत्या त्यांनी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. परंतू ज्यांना चढता आले नाही त्या महिला फलाटात पडल्याचे निदर्शनास येताच त्या लोकलमधील पुरुष डब्ब्यामध्ये असलेल्या प्रवाशांनी चैन पूलिंग केली, आणि जोपर्यंत बदलापूरच्या महिला चढणार नाही तोपर्यंत गाडी पुढे जाऊ देणार नाही असा पवित्रा सगळयांनी घेतला. त्यामुळे ट्रेन पुन्हा थांबली तेव्हा महिलांच्या डब्यांचे दरवाजे उघडण्यात आले, आणि मग काही महिला चढू शकल्या असे सांगण्यात आले. असे वर्तन आपल्या बदलापूर करा सोबत होते हे खपवून घेणार नाही. बदलापूरकर प्रवाशांनी घडल्या घटनेचा जाहीर निषेध केला, आणि त्याबाबत तक्रारीची नोंद व्हावी अशी मागणी।केली. ह्या सगळ्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज रेल्वे प्रशासनाने मिळवून संबंधितांवर कारवाई करावी असेही सांगण्यात आले.