अंबरनाथ: राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ अंबरनाथ ब्लॉक काँग्रेसच्या वतीने मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. शनिवारी दुपारी अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर काँग्रेस कार्यकर्ते एकत्रित येऊन मोदींविरोधात घोषणा देत होते.
राहुल गांधी हे मोदी सरकार च्या चुकीच्या धोरणांविरोधात आवाज उचलत असल्याने मोदी सरकारने राहुल गांधी यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. गांधीं विरोधातील हे षडयंत्र कदापि सहन केले जाणार नाही असे म्हणत काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी आज निदर्शने केली. ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.