कल्याण-काँग्रेस उत्तर भारतीयांची प्रतिष्ठा होती ,महाराष्ट्राचा गृहराज्य मंत्री उत्तर भारतीय झालाय ,मुंबई सारख्या महापालिकेचे तीन महापौर उत्तर भारतीय झाले ,आता आम्हाला।नगरसेवकाच्या तिकीट साठी भीक मागावी लागतेय असे विधान हिंदी भाषा जनता परिषद या कार्यक्रमादरम्यान शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वनाथ दुबे यानी केलं येणाऱ्या काळात आम्हाला प्रतिनिधित्व दिलं गेलं नाही तर आम्ही आमचा निर्णय घेवु व राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवू न देऊ असा सज्जड इशारा दिला आहे
होळी निमित्त डोंबिवली पुर्वेकडील पिंपलेश्वर मंदिर परिसरात हिंदी भाषा जनता परिषद कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले होते .या कार्यक्रमात भाजप आमदार रवींद्र चव्हाण ,शिवसेनेचे आंनद दुबे व योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार वंशीधर उपाध्याय उपस्थित होते .या कार्यक्रमात उत्तरं भारतीय समाजाने मोठी गर्दी केली होती .कार्यक्रमा दरम्यान समाजातील नेत्यांनी आपली व्यथा मांडली .याबाबत उत्तर भारतीय समाजातील समाजसेवक आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख विश्वनाथ दुबे यांनी सांगितलं की काँग्रेस उत्तर भारतीयांची प्रतिस्था होती .आता नगरसेवकासाठी भीक मागावी लागते या राज्याचे गृहराज्यमंत्री उत्तर भारतीय झाले आहे महापौर उत्तर भारतीय झाले आहेत कल्याण लोकसभेत ३ लाख ८० हजार उत्तर भारतीय मतदार आहेत फक्त आमचा वापर केला जातोय या राज्याच्या विकासात आम्ही सोबत आहे.
निवडणुकीत आम्ही काम।करतो मात्र आम्हाला प्रतिनिधित्व दिलं जात नाही दुबे यांचा इशारा शिवसेना भाजपाला होता ,कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीण मध्ये आम्ही उत्तर भारतीय आमदार निवडून आणू शकतो ,यंदा आम्ही संकल्प केला आहे की विचार केला गेला नाही तर आम्ही आमच्या ठरवू पक्ष आणि नेत्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा दिला आहे.