अंबरनाथ : शिंदेसेनेचे अंबरनाथचे आ. डॉ. बालाजी किणीकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची बाब समोर आली आहे. याबाबत ठाणे गुन्हे शाखेने अंबरनाथमधून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, शहरातील शिवसेनेच्याच दोघांना चौकशीसाठी बोलावले आहे.
किणीकर हे लग्न सोहळ्यासाठी लातूरला गेले आहेत. याच सोहळ्यात २६ डिसेंबर रोजी त्यांची हत्या करण्यासाठी काही शूटर्सना सुपारी दिल्याची माहिती स्वतः किणीकर यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी थेट ठाणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. किणीकर आणि शिंदेसेनेचे माजी शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यात गेल्या वर्षभरात राजकीय संघर्ष वाढला आहे.