शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

...तरी ‘फिनशार्प’चे कार्यालय उघडले कसे?; डोंबिवलीतील बँकेवर सहकार विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 06:39 IST

डोंबिवलीतील बँकेविरोधात गुन्हा दाखल करण्याची सहकार खात्याची सूचना 

डोंबिवली - केंद्र, राज्य सरकारकडे नोंदणी नाही, संचालक मंडळही नाही. मात्र, मोठ्या जाहिराती प्रसिद्ध करून डोंबिवलीत एक बँक चर्चेत आली आहे. फिनशार्प सहकारी बँक असे या बँकेचे नाव आहे. बँकेत कुठलीही खाती उघडलेली नाहीत तरी बँकेचे कार्यालय का सुरू झाले, अशी एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर सहकार विभागाने बँक चालविणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची सूचना पोलिसांना दिली. 

याप्रकरणी कारवाई झाली नसल्याने यंत्रणा सामान्यांची फसवणूक होण्याची वाट पाहत आहे का, असा सवाल नागरिक करीत आहेत. आगरकर रोड परिसरात फिनशार्प सहकारी बँक उघडण्यात आली. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात सायंकाळपर्यंत कार्यवाही करण्यात आलेली नव्हती. या संदर्भात  १४ फेब्रुवारीला होणाऱ्या सुनावणीनंतर पोलीस कारवाई करतील असे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, बँकेचा एक फलक मानपाडा रोडवर आढळून आला आहे. 

१४ फेब्रुवारीला सुनावणीफिनशार्प बँकेने कमी कागदपत्रे, किमान व्याज दरावर कर्ज, पारदर्शक व्यवहार, ठेवींवर साडेबारा टक्के व्याजाचे आमिष दाखविले आहे. याची तक्रार राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सहकार आयुक्त आणि ठाणे पोलिस आयुक्तांकडे केली. याची चौकशी सुरू असून, १४ फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. फिनशार्प सहकारी बँकेच्या चार संचालकांपैकी एक सतीश पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. बँकेत एक कर्मचारी होता त्याला बँकेबद्दल कोणतीही माहिती नव्हती.

याप्रकरणी सरकारने कारवाई केली पाहिजे. बेकायदा बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवले पाहिजे. फसवणूक होण्यापूर्वी कारवाई करायला हवी; पण तसे होताना दिसत नाही. - लक्ष्मण शिंदे, ज्येष्ठ नागरिक

अशा प्रकारच्या बँकांमध्ये कष्टाचे पैसे गुंतवू नयेत. त्यामुळे भविष्यात पश्चात्तापाला सामोरे जावे लागेल. संचयनी, टोरेस आदी विविध कंपन्यांनी  नागरिकांची फसवणूक केली. - शशिकांत कोकाटे, नागरिक

या बँकेत कोणतेही खाते नाही; परंतु कार्यालय उघडले आहे. यासंदर्भात आम्ही डोंबिवलीतील पोलिसांना माहिती दिली आहे. फसवणूक झालेली नाही; परंतु फसवणूक करण्याचा उद्देश असल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो का, याची खातरजमा पोलिसांनी करावी. पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. - आनंद कटके, उपनिबंधक, सहकार खाते