कल्याण - इंग्लंडहूनकल्याण डोंबिवलीत आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. आत्तार्पयत २० जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी सात जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर एकाची टेस्ट पॉझिटीव्ह आली असून ही रुग्ण महिला आहे. तिचा अहवाल आत्ता मुंबईनंतर पुण्याला पाठविला जाणार आहे. टेस्ट पॉझिटीव्ह आलेल्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. आता, पुण्याचा अहवाल काय येतो याकडे कल्याण डोंबिवलीकरांचे लक्ष लागले असून तो अहवाल जर पॉझिटीव्ह आला तर कल्याण डोंबिवलीकरांची चिंता वाढू शकते.
इंग्लंडमध्ये आढळून आलेल्या कोरोना विष्णाणूच्या जनुकीय रचनेत बदल झालेला आहे. नवीन विषाणूंचा स्ट्रेन दिसून आल्याने खबरदारीची उपाय योजना म्हणून केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर दरम्यान इंग्लंडहून कल्याण डोंबिवलीत आलेल्या ५५ जणांची यादी महापालिकेस सरकारने दिली होती. या यादीत काही नावे डबल होती.तसेच काही जण हे कल्याण डोंबिवली क्षेत्रबाहेरील होते. त्यानुसार महापालिकेने ४५ जणांचे सर्वेक्षण केले. एकूण ४५ जणांपैकी २० जणांची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यापैकी सात जणांची टेस्ट ही निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे महापालिकेने सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र रात्री उशिरा एका महिलेचा टेस्ट रिपोर्ट हा पॉझीटीव्ह आला आहे. तिचा रिपोर्ट मुंबईतील एनआयव्हीला पाठविला गेला. त्याठिकाणी तिचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. तिचा रिपोर्ट आत्ता पुण्यातील एनआयव्हीला पाठविला गेला आहे. रिपोर्ट पॉङिाटीव्ह आलेली रुग्ण ही १९ वर्षाची तरुणी आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्यात इतर कुठलीही लक्षणो दिसून आलेली नाहीत. तिला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. तिचा अहवाल जनुकीय रचनेच्या तपासणीकरीता पुण्याला पाठविण्यात आला आहे अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे. दरम्यान, नववर्षाच्या पाश्र्वभूमीवर सुट्टय़ा सगल जोडून आलेल्या आहेत. नववर्षाच्या पाश्वभूमीवर नागरीकांनी गर्दी करणो टाळावे. घराबाहेर फिरताना न चूकता मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टसिंगचे पालन करावे. काही लक्षणे आढळून आल्यास नजीगच्या आरोग्य केंद्राशी तातडीने संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.