कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका 2 लाख लसींच्या खरेदीसाठी निविदा काढणार आहे. मात्र महापालिका आयुक्त हे प्रशासक आहेत. त्यांनी निविदा प्रक्रिया न राबविता लस तयार करणा:या कंपन्यांकडूनच लसींची थेट खरेदी करावी अशी मागणी जागरुक नागरीक कौस्तुभ गोखले यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.
गोखले यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे की, महापालिका हद्दीत ज्यांना कोविशिल्ड आणि ज्यांना कोव्हॅक्सिनचा पहिला डोस दिला आहे. त्यांना दुसरा डोस द्यायचा आहे. जानेवारीपासून सुरु झालेल्या लसीकरण प्रक्रियेनंतर आतापर्यंत २ लाख ४ हजार नागरिकांना लस दिली गेली आहे. त्यामध्ये काही कोविशिल्डचे तर काही कोव्हॅक्सिनचा डोस घेणारे नागरीक आहेत. पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लसीचे डोस सरकारकडून उपलब्ध होत नसल्याने महापालिकेने २ लाख लसीचे डोस घेण्यासाठी निविदा काढणार आहे. तेही पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार आणि ठाणे महापालिकेच्या धर्तीवर हे काम केले जाणार आहे.
आयुक्त महापालिकेचे प्रशासक आहे. त्यांना महापालिका हद्दीतील १८ लाख नागरीकांच्या आरोग्य हितासाठी पालकमंत्र्यांच्या आदेशाची वाट पाहावी लागते. महापालिका हद्दीतील २ लाख नागरीकांचे लसीकरण झालेले आहे तर किमान १५ लाख नागरीकांचे लसीकरण बाकी आाहे. सध्या प्रशाकीय राजवट असताना माजी नगरसेवकांच्या प्रभागात लसीकरण केंद्रे सुरु केलेली आहेत. ही एक प्रकारची लसीकरणाची पक्षीय प्रचारकी मोहिम सुरु असल्याचा मेसेज नागरीकांमध्ये जात आहेत.
महापालिकेच्या १७ केंद्रावर लसीकरण लसीच्या डोस मिळत नसल्याने बंद ठेवले जाते. लस नसल्याने निविदा प्रक्रिया करुन लस मागविल्यास एक लसीची किंमत १ हजार रुपये असल्यास कंपनीकडून ती कंत्रटदार पुरवठा कंपनीला ८०० रुपये किंमतीत मिळू शकते. कंत्रटदार त्याच्या फायद्यासाठी हीच लस महापालिकेस जास्त दराने विकू शकतो.
जनतेच्या कराच्या रुपाने महापालिकेच्या तिजोरीत जमा होणारा पैसा जनतेच्या आरोग्यावर खर्च करताना त्याची उधळपट्टी होणार नाही हे पाहिले पाहिजे. महापालिकेने थेट लस खरेदी करावी. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची गरज नाही. लसीकरणाचा गोंधळ थांबविण्यासाठी पोलिओ लसीकरणा प्रमाणे थेट घरोघरी जाऊन नागरीकांना लसीचे डोस दिल्यास गोंधळ होणार नाही, याकडे गोखले यांनी लक्ष वेधले आहे.