कल्याण : कल्याणडोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक निर्बंध लादण्यात आलेले आहे. तरी देखील कोरोना रुग्णांचे नातेवाईक आणि होम आयसोलेशन असलेले अनेक जण शहरात मोकाट फिरत असल्याचे चित्र आहे. हे रुग्ण ज्या सोसायटीत राहतात त्या सोसायटीला पोलीस फोन करुन ताकीद देणार आहे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. (Corona Virus in Kalyan-Dombivali: police will keep an eye on the relatives of the corona patients and home isolate patients!)
आयुक्तांची कोरोना संदर्भातील एक महत्वपूर्ण बैठक आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत पार पडली. या बैठकीस पोलीस उपायुक्त विवेक पानसरे हे देखील उपस्थित होते. बैठकीपश्चात ही माहिती आयुक्तांनी दिली आहे. आयुक्तांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादूर्भाव मागच्या वर्षी वाढला होता. त्यावेळी प्रत्येक वार्डात कोरोना नियंत्रण समिती नेण्यात आली होती. त्यामध्ये विद्यमान नागरसेवक होते. त्यात आत्ता माजी नगरसेवकांचाही सहकार्य घेऊन कोरोना नियंत्रणात आणण्याकरीता त्यांची मदत घेतली जाईल.
कोरोना लसीकरणाची सेंटर वाढविण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. लसीकरण केंद्रे वाढविण्यासंदर्भाता आजच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानुसार पाटीदार भवन येथील कोविड सेंटर येथे आणि दोन आरोग्य केंद्रात लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शहरातील जी खाजगी रुग्णालये मोफत लसीकरण करण्यास तयार आहे. त्यांना लसीकरण केंद्रे सुरु करण्यास परवानगी देण्याचा विचार करण्यात येणार आहे.
पाच दिवस पुरेल इतका लसीचा साठा महापालिकेकडे आहे. उद्या ३१ मार्च रोजी नव्याने लसीचा साठा उपलब्ध होणार आहे. लसीकरणाची प्रक्रिया सुरळीत सुरु आहे. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे.
शिष्ट मंडळाच्या माध्यमातूनही मागणी करता आली असतीडोंबिवलीत व्यापाऱ्यांनी केडीएमसी निर्बंधाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले. एक दिवसाची शिथिलता हवी होती. त्यानुसार त्यांना एक दिवसाची शिथिलता दिली होती. व्यापाऱ्यांची जबाबदारी होती, त्यांना कोरोनाचे नियम पाळले पाहिजे होते. रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यापेक्षा शिष्ट मंडळाच्या माध्यमातून प्रशासनाकडे मागणी करता आली. नियम मोडले म्हणून १२५ व्यापाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. केलेली कारवाई ही योग्य असल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.
काही दुकानदारांनी कोरोना नियमवलीचा भंग केलाशिथिलता देऊन देखील काही दुकानदारांनी कोरोना नियमवलीचा भंग केला आहे. तसेच दारुची दुकाने उघडी होती. नियम पाळले गेले नाही. उत्पादन शुल्क विभागाकडून दारुच्या दुकानदारांना सूचित केले गेले नसल्याची बाब समोर येत असल्याने त्यांना यापूढे सूचित केले जाईल. मात्र साथ रोग नियंत्रणात एका विशिष्ट यंत्रणो करीता नियम काढता येत नाही. काढलेले आदेश हा सगळ्य़ांनाच लागू असतो असे आयुक्तांनी सांगितले.