- अनिकेत घमंडीडोंबिवली - गतवर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन नंतर यंदा अनलॉक झाले. सगळं काही सुरू झाले असून शाळा मात्र सुरू होत नसल्याने भय इथले संपवत नाही, अशा आशयाचे विडंबनातून शिक्षणाची जनजागृती करून राज्य शासनाने शाळा सुरू करण्यासाठी सकारात्मक पावले उचलावीत यासाठी येथील राजेंद्र शिक्षण संस्थेच्या विद्यानिकेतन शाळेच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी स्कुल बसच्या पाठीमागे फलक लावण्यात आले असून त्याद्वारे शाळा सुरू करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. (Vidyaniketan School ironically laments that the school is not starting)याबाबत संस्थेचे अध्यक्ष, संचालक विवेक।पंडित म्हणाले की, गतवर्षी सगळ्या सोबतच शाळा बंद झाल्या. त्यांच्यानंतर जून महिन्यात लोकल सेवा अंशत सुरू झाली. त्यापाठोपाठ सगळं सुरू झालं,खूप प्रयत्न, पत्र व्यवहार करून अवघ्या पंधरा दिवसांसाठी शाळा सुरू झाली, पण ती देखील कोरोनाचे आकडे वाढायला लागल्याने बंद करावी लागली. यामध्ये विद्यार्थ्यांचे खूप नुकसान झाले आहे. त्या उद्देशाने भावपूर्ण आठवण, आता वर्ष होईल तुला बंद करून असे फलकावर ठळकपणे लिहिण्यात आले आहे. त्यानुसार मॉल सुरू झाले, गाजावाजा करून ऑनलाइन शिक्षण अनेकांना ते मिळण्याची सुविधा नसतानाही कागदोपत्री दाखवून कसे बसे सुरू आहे. आता तर सगळं सगळं सुरू झालं, पण शाळा मात्र बंद असून भय इथले संपवत नाही अशा आशयाचा मजकूर लिहून शाळा सुरू करण्याची मागणी मांडण्यात आली आहे. पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यासाठी हमीपत्र लिहून दिले, पण तरीही शाळा बंदच आहेत, निदान तो निर्णय तरी शाळा प्रशासनाला घेऊ द्यावा आणि शाळा सुरू करावी असे देखील फलकाद्वारे घोषित केले.
coronavirus: ...भय इथले संपवत नाही! विद्यानिकेतन शाळेने विडंबनातून मांडली शाळा सुरू होत नसल्याची खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 5:54 PM