बदलापूरमध्ये ऑक्सिजन लावण्यात आल्यामुळे एका कोरोना रूग्णाच्या चेहऱ्यावर गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारमुळे अतिदक्षता विभागात ऑक्सिजनवर असलेल्या कोरोना रुग्णांना आता या नव्या समस्येला सामोर जावं लागत आहे.
कोरोना झाल्याने बदलापूर गावातील प्रदीप गंद्रे यांना शहरातील आशीर्वाद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्याने 19 दिवस त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलत. ऑक्सिजन मास्कमुळे प्रदीप गंद्रे यांच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्यात. मास्क घट्ट बांधण्यात आल्याने नाक आणि कपाळावर जखमांमुळे काळे डाग पडलेत. एकच मास्क 19 दिवस लावल्याने माझा चेहरा विद्रूप झाल्याचा आरोप गंद्रे यांनी केला आहे.
प्रकृती नाजूक असल्याने त्यांना 19 दिवस 24 तास ऑक्सिजन लावण्यात आला होता. तसेच रुग्णाला ऑक्सिजन मिळावे म्हणून हा मास्क टाईटपणे लावण्यात येतो. त्यामुळे या जखमा झाल्या असल्याचे रुग्णालया प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. ज्याची स्किन नाजूक असते त्यांना असे व्रण पडतात असे देखील सांगण्यात आलं आहे.