शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

CoronaVirus News: कल्याणमध्ये रेमडेसिवीर ‘आऊट ऑफ स्टॉक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 12:51 AM

रुग्णांचे नातेवाईक मेडिकलसमोर रांगेतच

कल्याण : कल्याण पूर्व भागातील चक्कीनाका परिसरातील अमेय मेडिकल या एकाच दुकानात कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत होते. ते मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक रात्रभर रांगा लावत होते. मात्र शुक्रवारी या दुकानातील रेमडेसिवीर इंजेक्शनचा स्टॉक संपला आहे. त्यामुळे इंजेक्शनसाठी रांगेत उभे असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांच्या पदरी घोर निराशा आली. त्याचबरोबर आपल्या रुग्णाचा जीव वाचणार की नाही याची चिंता त्यांना सतावू लागली आहे. काही रुग्णांचे नातेवाईक इंजेक्शनचा स्टॉक संपला असतानादेखील दुकानासमोर रांगेत उभे होते.रेमडेसिवीर हे इंजेक्शन कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महत्त्वाचे आहे. हे इंजेक्शन केवळ कल्याण पूर्व भागातील अमेय मेडिकल या एकाच दुकानात उपलब्ध होत असल्याने कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, शहाड, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ, ग्रामीण भागातून रुग्णांचे नागरिक अमेय मेडिकल येथे इंजेक्शनकरिता रांगेत उभे राहत होते. बुधवारच्या रात्री त्या ठिकाणी ११ वाजेपर्यंत रुग्णांचे नातेवाईक रांगेत होते. इंजेक्शन देताना गोंधळ उडू नये यासाठी मेडिकलमधून टोकन दिले जाते. त्यानुसार इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनची किंमत यापूर्वी तीन ते चार हजार रुपये इतकी होती. ती नियंत्रित करण्यात आली असून आता ८९९ रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होत आहे. इंजेक्शन कालपर्यंत अमेय मेडिकलमध्ये उपलब्ध होते. शुक्रवारी या दुकानातही इंजेक्शनचा स्टॉक संपल्याने रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी ठाणे, मु्ंबईला धाव घ्यावी लागणार आहे. त्यात वीकेण्ड लॉकडाऊन असल्यामुळे ठाणे, मुंबई गाठायचे कसे, असा प्रश्न काही मंडळींकडून उपस्थित केला जात आहे. हे इंजेक्शन अन्य मेडिकल दुकानांतही उपलब्ध व्हावे, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून केली जात आहे. आरोग्यमंत्र्यांनी सांगितल्यानुसार इंजेक्शनची गरज नसताना केवळ पैसे उकळण्यासाठी काही खासगी डॉक्टर रेमडेसिवीर इंजेक्शन रुग्णाला देण्याची शिफारस करीत आहेत. त्यामुळे ही स्थिती उद्भवत आहे.इंजेक्शनचा तुटवडा पाहता बाजारात इंजेक्शनचा काळाबाजार केला जात असल्याचा आरोप भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केला आहे. दरम्यान, कल्याणमधील इंजेक्शन खरेदीची गर्दी पाहून व असलेला तुटवडा पाहता कल्याण पश्चिमेचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला. पालकमंत्र्यांनी ५०० इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन भोईर यांना दिले. त्यावर भाजप आमदारांनी ज्यांना इंजेक्शन हवे असल्यास त्यांनी ज्यांना डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा, असे स्पष्ट केले. आमदार भोईर यांचा नामोल्लेख न करता आमदार गायकवाड यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनप्रकरणी भोईर यांच्यावर निशाणा साधला आहे.पालिकेकडे पाच हजार इंजेक्शन उपलब्धकेडीएमसीने १२ हजार रेमडेसिवीर इंजेक्शन मागविली आहेत. सध्या पाच हजार इंजेक्शन पालिकेकडे उपलब्ध आहेत.  ही इंजेक्शन कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी आहेत. असे नियोजन करणारी केडीएमसी ही राज्यातील पहिली महापालिका असल्याचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले.