कल्याण-कोरोनामुळे मार्च महिन्यापासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. ग्रामीण भागाप्रमाणोच शहरी भागातही रोजगार हमी योजना राबविण्यात यावी या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीतर्फे आज कल्याणमध्ये निदर्शने करण्यात आली.
भाकपच्या स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियाच्या कवित वरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या निदर्शने आंदोलनात परवीन खान. पी. के. लाली, सुनिता खैरनार, ज्योती तायडे, विनोद सेतू, राजेश जाधव, उदय चौधरी, कल्पना तराडे, हेमा यादव, आशा थोरात, सुनिता यादव, नाजिया शेख आदी सहभागी झाले होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यापासून निदर्शने करीत भापक कार्यकर्ते तहसील कार्यालयाजवळ गेले. तहसीलदाराना मागण्याचे निवेदन दिले. त्याचबरोबर महापालिका अधिका:यांनाही निवेदन देण्यात आले. लॉकडाऊनचा फायदा घेऊन मोदी सरकार ऑनलाईन शिक्षण लादत आहे. जनतेच्या पैशातून पंतप्रधान राष्ट्रपती भवनाशेजारीच २० हजार कोटी रुपये खर्च करुन आलिशान घर बांधत आहेत. देशातील रेल्वे, जंगल, शिक्षण, बँका, विमा, कोळसा खाणी टेलिकॉम यांचे खाजगीकरण केले जात आहे. शेतक:यांना कजर्मुक्ती द्या, शेतकरी विरोधी कायदे मागे घ्या. कामगार विरोधी कायदे रद्द करा. वीज दर भरमसाठ वाढविले आहेत. वीज विधेयक मागे घ्या. कोविड काळात आयकर न भरणा:या सामान्य कुटुंबाना दर महिन्याला साडेसात हजार रुपयांचा निर्वाह भत्ता द्या. राज्यातील स्थलांतरीत कामगारांसाठी स्वतंत्र कायदे करा राज्य सरकारचा जीएसटीचा वाटा द्यावा आदी मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली आहेत.