कल्याण - कॅब चालकास लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आदीळ शेख आणि मुजाहिदीन लांजेकर अशी आहेत. संचारबंदीमुळे लूटीचा प्रयत्न फसला आहे. मुंबई अॅन्टॉप हिल येथे राहणारे मुन्वर हुसेन शेख हे कॅब चालक आहे. 13 एप्रिल रोजी मुन्वर हे एक प्रवासी भाडे घेऊन डोंबिवलीस आले होते. भाडे सोडल्यावर ते पुन्हा कल्याणच्या दिशेने मुंबईला निघाले होते. त्यांची गाडी पत्री पूल ते गोविंदवाडी बायपास रस्त्यावरील फानूस ढाब्याजवळ आली. त्यावेळी दोन जणांनी त्यांची गाडी अडवून गाडीत घुसले. त्यांना मुन्वर यांना चाकूचा धाक दाखवून गाडीचा ताबा घेतला.
मुन्वर याच्याकडील रोकड आणि मोबाईल हिसकावून घेतली. तसेच गाडी कल्याण स्टेशनच्या दिशेने घेण्यास सांगितली. मुन्वरच्या एटीएममधून पैसे काढून देण्याचा तगादा त्यांनी मुन्वरकडे लावला होता. गाडी कल्याण स्टेशनच्या दिशेने जात असताना समोर समोर पोलिसांची गाडी येताना दिसली. पोलिसांना समोर येणा:या कारमध्ये काही तरी अनुचित घडत असल्याचा संशय आला. कार चालविणाऱ्या हॅण्ड ब्रेक लावून दरवाजा उघडय़ाचा प्रयत्न केला असता तेव्हा मुन्वर यांनी आरडाओरडा केला. पोलिस गाडीच्या दिशेने धावले. त्यांनी मुन्वरला लूटणा:या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास बाजारपेठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक यशवंत चव्हाण करीत आहेत. या प्रकरणी कल्याणचे पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या दोघांपेकी एकाच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोघांनी मिळून अन्य किती लोकांची लूट केली आहे याचा पोलिस तपास करीत आहेत.