- मुरलीधर भवार
कल्याण- ठाकरे आणि शिंदे गटात सुरु असलेल्या वादात ठाकरे गटातील जिल्हा प्रमुख विजय साळवी यांना तडीपारीची नोटीस कल्याणपोलिसांनी दिली आहे. अन्याय कारवाईस कायदेशीर उत्तर देणार अशी प्रतिक्रिया साळवी यांनी दिली आहे. मात्र नोटिसची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे.
विजय उर्फ बंडया साळवी हे काही दिवसापूर्वी चर्चेत आले होते. कारण होते त्यांच्या पक्ष निष्ठा गणपती देखाव्यास पोलिसांनी आक्षेप घेत देखावा जप्त केला होता. त्यानंतर न्यायालयात धाव घेऊन आक्षेपार्ह देखावा काढून पुन्हा हा देखावा परवानगी मिळविली होती. या देखाव्या प्रकरणी साळवी यांच्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. आत्ता पोलिासंकडून साळवी यांना तडीपारीची नोटिस दिली गेली आहे. या नोटिसमध्ये त्यांना विचारणा केली आहे की, मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता तुम्हा तडीपार का करण्यात येऊ नये. या संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण मागितले गेले आहे.
विजय साळवी यांच्या विरोधात काही गुन्हे दाखल आहेत. या बाबत साळवी यांचे म्हणणो आहे की, हे सर्व राजकीय गुन्हे आहे. अन्यायकारक या कारवाईस ते कायदेशीर उत्तर देणार आहे असे जिल्हा प्रमुख साळवी यांनी सांगितले.