शहरं
Join us  
Trending Stories
1
Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल
2
दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ५ जुलै २०२४; नोकरीत पदोन्नती संभवते, रागावर ठेवा नियंत्रण
4
विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?, आज होणार फैसला; माघार कोण घेणार याकडे लक्ष
5
...तर भोलेबाबांचीही चौकशी,  २ महिलांसह ६ सेवेकरी अटकेत; 'त्या'साठी १ लाखाचं बक्षीस
6
महिन्यात कमाई ५३ लाख काेटी, सेन्सेक्स उच्चांकाची हॅट्ट्रिक, प्रथमच ८० हजारांवर बंद
7
आता पेपर फोडणाऱ्यांची संपत्तीही होणार जप्त; बिहार पोलिस करणार कडक कारवाई
8
काेणते शहर आहे सर्वात महागडे?; महाराष्ट्रातील २ शहरांचा यादीत समावेश
9
सागरी सुरक्षिततेसाठी लवकरच भरती, स्थानिकांना प्राधान्य देणार; फडणवीसांची ग्वाही
10
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणारे लाडके निर्णय, एकनाथ शिंदे अन् पुढे काय?
11
शेअर बाजार ऐंशी हजार पार.. आता पुढे काय ही उत्कंठा !
12
चिंटुकल्या मुंग्या ‘शस्त्रक्रिया’ही करतात; एका संशोधनातून आणखी एक गुण समोर
13
विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर राहुल गांधींचा गुजरात दौरा; पीएम मोदींना देणार आव्हान...
14
“राज्यात आता लाडका शेतकरी योजना लागू करा”; संजय राऊतांची मागणी, सरकारवर केली टीका
15
लोकसभेतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला, या दोन राज्यांत स्वबळावर निवडणूक लढणार
16
Victory Parade : मरीन ड्राईव्ह परिसरात मोठी गर्दी; चाहत्यांचा महासागर, CM शिंदे ॲक्शन मोडवर
17
मुंबई: वानखेडे, मरिन ड्राइव्हवर तोबा गर्दी; 'टीम इंडिया'ची बस 'ट्रॅफिक जाम'मध्ये अडकली!
18
Zomato चा मोठा निर्णय, देशभरात बंद केली ही खास सेवा! अशी आहे शेअरची स्थिती
19
Video: "तंटा नाय तर घंटा नाय..."; रितेश देशमुखच्या 'बिग बॉस मराठी ५' चा नवा प्रोमो रिलीज
20
“देशाचा पंतप्रधानच सर्वांत मोठा बुवा, तिथूनच...”; हाथरस प्रकरणावरुन संजय राऊतांची टीका

सीलबंद प्रवेशद्वारांमुळे प्रवाशांचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 1:18 AM

कल्याण रेल्वेस्थानकाबाहेरील चित्र : सोशल डिस्टन्सिंग, वाहतुकीचाही वाजला बोऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : लॉकडाऊनमध्ये कल्याण रेल्वेस्थानकात संबंधित प्रशासनाने सीलबंद केलेल्या प्रवेशद्वारांपैकी एकच प्रवेशद्वार सद्यस्थितीला सुरू ठेवल्याने पश्चिमेकडील भागातील प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे. स्थानकाबाहेर पडणारे प्रवासी एकाच प्रवेशद्वारातून येत असल्याने गर्दी वाढून सोशल डिस्टन्सिंगचेही तीनतेरा वाजल्याचे चित्र सकाळ-संध्याकाळ दिसत आहे. रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षा स्टॅण्डही सीलबंद असल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन महात्मा फुले चौक ते कल्याण बसस्थानक मार्ग परिसरात वाहतूक कोंडीचा सामनाही पादचारी आणि अन्य वाहनांना करावा लागत आहे.

कोरोना रुग्णांमध्ये काहीशी घट झाल्याने रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस सुरू केल्या असून, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेल्या लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ठरावीक वेळेत महिलांनाही लोकलमधून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे. परिणामी लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. मात्र पश्चिमेकडील रेल्वे न्यायालयालगत असलेले मुख्य प्रवेशद्वार वगळता कोरोना काळात सीलबंद केलेले अन्य प्रवेशद्वार प्रशासनाकडून खुले करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुख्य प्रवेशद्वारातूनच प्रवाशांना ये-जा करावी लागत आहे. महत्त्वाचे म्हणजे रेल्वे स्थानकाबाहेरील सीलबंद केलेले रिक्षास्टॅण्डही खुले करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे बाहेरील रस्त्यावरच रिक्षा उभ्या कराव्या लागत आहेत. यामुळे वाहतूक कोंडीत भर पडतेच, त्याचबरोबर प्रवाशांची गर्दी होऊन सोशल डिस्टन्सिंगचा फज्जाही उडत आहे. 

नाहक भरावा लागतोय दंडरिक्षास्टॅण्ड सीलबंद असल्याने रिक्षा रस्त्यावरच उभ्या कराव्या लागत आहेत. यात रिक्षांची संख्या वाढून अन्य वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. परिणामी वाहतूक नियमन कारवाईत रिक्षाचालकांना दंडात्मक कारवाईला नाहक सामोरे जावे लागत आहे. यामुळे रिक्षाचालकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.आंदोलनाचा दिला इशारालॉकडाऊन कालावधीत सीलबंद केलेले रिक्षास्टॅण्ड खुले करावेत, असे पत्र रिक्षा-टॅक्सी चालक-मालक असोसिएशनच्या वतीने मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानक प्रबंधकांना २२ ऑक्टोबरला देण्यात आले होते. परंतु आजतागायत रिक्षास्टॅण्ड खुले केलेले नाहीत. दरम्यान मंगळवारी पुन्हा एकदा यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला असून सात दिवसात रिक्षास्टॅण्ड खुले न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिल्याची माहिती असोसिएशनचे सहसचिव संतोष नवले यांनी दिली.