शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

 राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत 1 हजाराहून अधिक फुलझाडांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2021 2:07 PM

नागरिकांचा प्रतिसाद पाहता तब्बल 1 हजार 53 फुलझाडांचे वाटप अवघ्या एका तासात  झाले.

कल्याण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण डोंबिवली शहरात ठिकठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र डोंबिवलीतील कार्यक्रम हा सर्वांपेक्षा आगळावेगळा ठरला आहे .कल्याणचे आमदार राजु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे डोंबिवली शहराच्या वतीने डोंबिवलीकर नागरीकांना विविध फुलझाडांचे मोफत वाटप  करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. नागरिकांचा प्रतिसाद पाहता तब्बल 1 हजार 53 फुलझाडांचे वाटप अवघ्या एका तासात  झाले.        गेली दिड वर्ष कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण जग त्रासलेले असताना हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येऊन पुर्वीप्रमाणेच लोकांचे जीवन उत्साहाने भारलेले,टवटवीत,सुगंधी व रंगीबेरंगी व्हावे यासाठी गुलाब,मोगरा,जास्वंद अशी मनमोहक फुलझाडे वाटुन लोकांच्या जीवनात या दिवसानिमित्ताने चैतन्य जागृत होऊन नैराश्य व मरगळ दूर व्हावी तसेच या माध्यमातून झाडे लावा,झाडे जगवा हा सामाजिक संदेश घरोघरी जावा असा हेतू ठेवून सदर उपक्रम राबविल्याचे मनसे डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी यावेळी सांगितले.या

उपक्रमासाठी मनसे शहरसंघटक योगेश  पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी महिलांनी देखील आग्रहानं आपल्या आवडीचे फुलझाड घेत या उपक्रमाला पाठींबा दिला. मात्र एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी।होत असताना राजकीय उपक्रमांमुळे  रस्त्यावर गर्दी होताना दिसत आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेkdmcकल्याण डोंबिवली महापालिका